शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

आदर्श आचारसंहितेचा भंग करणा-यांची गय करू नका!

By admin | Updated: October 3, 2014 00:35 IST

सामान्य निवडणूक निरीक्षक सुंदरम यांच्या वाशिम निवडणुक अधिकारी व कर्मचा-यांना सूचना.

वाशिम : जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघांमध्ये आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन होणे आवश्यक आहे. आचारसंहितेचा भंग करणार्‍यावर तत्काळ कारवाई करण्यात यावी, अशी सूचना सामान्य निवडणूक निरीक्षक मिनाक्षी सुंदरम यांनी निवडणूक प्रक्रियेतील सर्व अधिकारी, कर्मचार्‍यांना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या सर्व नोडल अधिकारी, आचारसंहिता पालनाविषयी नियुक्त विविध पथकांच्या प्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी बी.के. इंगळे, वाशिम मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी राजेश पारनाईक, रिसोड मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अशोक अमनकर, सार्वजिनक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता के.डी. पाडेवार आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील वाशिम, कारंजा व रिसोड या तिन्ही मतदारसंघात होणार्‍या राजकीय पक्षाच्या व नेत्याच्या प्रत्येक प्रचार सभेवर निवडणूक यंत्रणेने बारकाईने लक्ष ठेवावे व त्या सभेचे छायाचित्रीकरण करावे. कोणत्याही उमेदवाराकडून मतदाराला पैशाचे वाटप होऊ नये यासाठी सर्वांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. असा प्रकार होत असल्याचे समजताच तत्काळ कारवाई करावी तसेच धार्मिक स्थळे, धार्मिक कार्यक्रम, सण याचा वापर निवडणूक प्रचारासाठी होत असेल तर त्याविरुद्ध तत्काळ कारवाई करावी, अशा सूचना यावेळी मिनाक्षी सुंदरम यांनी दिल्या.