शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

पाणी पिताय ना; मग काळजी घ्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:49 IST

शारीरिक कष्टाची कामे करत असलेल्या व्यक्तींना दिवसाला दोन ते अडीच लिटर पाण्याची गरज भासते. उन्हाळ्यात शरीराला स्वतःहून पाणी हवे ...

शारीरिक कष्टाची कामे करत असलेल्या व्यक्तींना दिवसाला दोन ते अडीच लिटर पाण्याची गरज भासते. उन्हाळ्यात शरीराला स्वतःहून पाणी हवे असते; अन्य ऋतूंमध्ये पाणी आठवणीने प्यावे लागते. निरोगी आरोग्यासाठी दिवसभरात जवळपास आठ ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे.

........................

दूषित पाण्यामुळे होणारे आजार

विशेषत: पावसाळ्यात ठिकठिकाणी साचणाऱ्या दूषित पाण्यामुळे विविध स्वरूपातील संसर्गजन्य आजार पसरतात. या काळात डायरिया, कॉलरा, वाताचे विकार जडण्यासोबतच सर्दी, खोकला, ताप यासारखे आजार जडतात. दूषित पाण्यामुळे काविळ, गॅस्ट्रो, लेप्टोस्पायरोसिस यासारखेही विकार जडतात.

...............

पाणी उकळून प्यायलेले बरे

उकळून थंड केलेले पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. कोमट पाणी अनेक आजारांपासून शरीराला सुरक्षित ठेवते. सकाळच्या सुमारास झोपेतून उठल्यानंतर अंशापोटी किंवा रात्री जेवण झाल्यानंतर एका तासाने कोमट पाणी प्याल्याने कफ व पोटाचे विकार नाहीसे होतात.

..................

आजाराची लक्षणे

दूषित पाणी प्याल्याने एक किंवा त्यापेक्षा अधिक वेळा पातळ शाैचास होण्याचा विकार जडू शकतो. त्यास अतिसार म्हणतात.

दूषित पाणी तसेच अन्नपदार्थांमधून पसरणारी काविळ वर्षभर असते; मात्र पावसाळ्यात या संसर्गजन्य आजारात वाढ होते.

उलटी आणि जुलाब यासारखी लक्षणेही दूषित पाण्यातून दिसून येतात. त्यास गॅस्ट्रो म्हणून संबोधण्यात येते.

पोलिओ आणि विषमज्वर यासारखे आजारही दूषित पाणी पिण्यात आल्याने होतात.

....................

वाशिमकर दररोज पितात १० दलघमी पाणी

वाशिम तालुक्यातील केकतउमरा गावानजीकच्या एकबुर्जी प्रकल्पातून वाशिम शहराला पाणीपुरवठा केला जातो. स्थानिक नगर परिषदेकडून शहरातील नागरिकांना नळाव्दारे १० दशलक्ष घनमीटर इतका पाणीपुरवठा केला जातो. दरडोई १२५ लिटर पाणी पुरविण्यात येते. पाणी शुद्धीकरणाची रितसर प्रक्रिया राबवूनच निर्जंतुक झालेले पाणी नळाव्दारे पुरविण्यात येत असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे पंकज सोनोने यांनी दिली.