जिल्हाधिका-यांनी घेतला जिल्हा वार्षिक योजना निधी खर्चाचा आढावा
By Admin | Updated: March 6, 2015 01:54 IST2015-03-06T01:54:56+5:302015-03-06T01:54:56+5:30
अखर्चीत निधीचा आढावा.

जिल्हाधिका-यांनी घेतला जिल्हा वार्षिक योजना निधी खर्चाचा आढावा
वाशिम : जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी रामचंद्र कुलकर्णी यांनी विविध शासकीय विभागांकडून जिल्हा वार्षिक योजना २0१४-१५ अंतर्गत कामांवर फेब्रुवारी २0१५ अखेर झालेल्या खर्चाचा आढावा घेतला. तसेच अखर्चीत निधीच्या खर्चाविषयी संबंधित विभागाने केलेल्या नियोजनाबाबतची माहिती घेतली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय इंगळे, समाज कल्याण विभागाचे सहायक संचालक एम. जी. वाठ, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण, उपजिल्हा निबंधक खाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता के. डी. पाडेवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेखा मेंढे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी यावलीकर, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर, आत्माचे प्रकल्प संचालक विजय चवाळे, प्र. जिल्हा ग्रंथालय अधिकारी अरविंद ढोणे, जिल्हा शिक्षण अधिकारी अंबादास पेंदोर आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी कुलकर्णी म्हणाले की, जिल्हा वार्षिक नियोजनमधून वितरित करण्यात आलेल्या निधीतून होणारी कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व विभागांनी तातडीने कार्यवाही करावी. विशेषत: जलयुक्त शिवार योजनेमधील कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत. तसेच काही विभागांनी निधी खर्च करणे शक्य नसल्याने त्यांच्याकडील निधी परत केला आहे. हा निधी प्राधान्याने जलयुक्त शिवार योजनेतील कामांसाठी देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.