नियमित पाणी पुरविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:49 IST2021-09-04T04:49:44+5:302021-09-04T04:49:44+5:30

.............. अवैध प्रवासी वाहतूक जोरात वाशिम : शहरातून अनसिंग मार्गावर अवैध प्रवासी वाहतूक सध्या जोरात सुरू आहे. क्षमतेपेक्षा अधिक ...

Demand for regular water supply | नियमित पाणी पुरविण्याची मागणी

नियमित पाणी पुरविण्याची मागणी

..............

अवैध प्रवासी वाहतूक जोरात

वाशिम : शहरातून अनसिंग मार्गावर अवैध प्रवासी वाहतूक सध्या जोरात सुरू आहे. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेऊन जाणाऱ्या अशा वाहनांकडे पोलिसांचेही दुर्लक्ष होत असून हा प्रश्न अधिकच गंभीर होत चालल्याचे दिसत आहे.

..............

अंतर्गत रस्त्यांच्या डागडुजीची मागणी

वाशिम : शहरातील जुनी आययुडीपी काॅलनी परिसरातील अंतर्गत रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडून पावसाचे पाणी साचत आहे. न. प. ने रस्त्यांची किमान डागडुजी करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

..............

वीज देयक वसुलीची मोहीम

वाशिम : शहरातील घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक विद्युत ग्राहकांकडे असलेला थकबाकीचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर वीज देयक वसुलीची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता आर. जी. तायडे यांनी दिली.

Web Title: Demand for regular water supply