वृद्ध कलावंतांना आर्थिक सहाय्य देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:47 IST2021-09-12T04:47:51+5:302021-09-12T04:47:51+5:30

मागील दोन वर्षांच्या काळापासून कोविड -१९ च्या प्रादुर्भावामुळे व सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रातील सर्वच गावागावात सांस्कृतिक व ...

Demand for financial assistance to older artists | वृद्ध कलावंतांना आर्थिक सहाय्य देण्याची मागणी

वृद्ध कलावंतांना आर्थिक सहाय्य देण्याची मागणी

मागील दोन वर्षांच्या काळापासून कोविड -१९ च्या प्रादुर्भावामुळे व सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रातील सर्वच गावागावात सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम पूर्णत: बंद पडले आहे. त्यामुळे वृद्ध कलावंतांवर उपासमारीची पाळी आलेली आहे. अशातच काही वृद्ध कलावंतांना कोविड -१९ या आजाराने ग्रासल्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड पडला आहे. काही वृद्ध कलावंत कोविड-१९ या आजारात दगावले असून, त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आणि कुटुंबातील कर्ता व्यक्ती गेल्यामुळे आर्थिक संकटही कोसळले आहे. अशा कलावंतांना व त्यांच्या कुटुंबाला दुःखातून सावरण्याकरिता आर्थिक सहाय्य मिळण्याची नितांत आवश्यकता आहे. मागील दोन महिन्यांच्या काळात महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाने वृद्ध कलावंत आर्थिक सहाय्य घोषित करून दिलासा दिला आहे; परंतु अजूनपर्यंत आर्थिक सहाय मिळालेले नाही. त्यामुळे हे सहाय्य द्यावे, तसेच शासनाने वारकऱ्यांना जे आर्थिक सहाय्य देण्याची घोषणा केली, त्यामध्ये राष्ट्रीय कीर्तनकारांचा समावेश करावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सीताराम महाराज दबडे, सचिव राजाराम राऊत, गोपालराव शिंदे, सहसचिव लक्ष्मणराव इंगळे, गुलाबराव पांडे, सुरेश आमटे, संतोष धनवे, नंदाबाई शिंदे, दुर्गाबाई गिऱ्हे, कुसुम खडसे, कांचनबाई भुरके, वनिता धनवे, बबिता महाकाळ, नम्रता इंगळे, विमल सुर्वे, महानंदा मुंदे, सुमित्रा आमटे आदींची उपस्थिती होती.

110921\1758-img-20210911-wa0016.jpg

वृद्ध कलावंतांना आर्थिक साहाय्य देण्यात यावे

* कलावंत संस्थेचे आ.झनक यांना निवेदन *

मंगरुळपीर ता ११/(ता प्र) वृद्ध कलावंतांना शासनाकडून मिळणारे नियमित मानधन व कोरोना काळातील आर्थिक सहाय्य देऊन मानधनात वाढ करावी अशी मागणी येथील श्री तुकडोजी महाराज वृद्ध साहित्यीक लोक कलावंत बहुउद्देशीय संस्थेने ता ११ रोजी आ.अमित झनक यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, मागील दोन वर्षाच्या काळापासून कोविड -१ ९ च्या प्रादुर्भावामुळे व सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊन मुळे महाराष्ट्रातील सर्वच गावागावात सांस्कृतीक व धार्मीक कार्यक्रम पुर्णत : बंद पडले आहे . त्यामुळे वृध्द कलावंतावर उपासमारीची पाळी आलेली आहे . अशातच आम्हापैकी काही वृद्ध कलावंतांना कोविड -१ ९ या आजाराने ग्रासल्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दन्ड पडला आहे .आम्हापैकी काही वृध्द कलावंत कोविड - १ ९ या आजारात दगावले असून त्यांच्या कुटूंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आणि कुटुंबातील कर्ता व्यक्ती गेल्यामुळे आर्थिक संकटही कोसळले आहे . अशा कलावंतांना व त्यांच्या कुटूंबाला दुखातून सावरण्यांकरीता आर्थिक सहाय्य मिळण्यांची नितांत आवश्यकता आहे.मागील दोन महिन्याच्या काळात महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाने वृध्द कलावंत आर्थिक सहाय्य घोषीत करून काहीसा दिला आहे परंतु अजून पर्यन्त आर्थिक सहाय मिळालेले नाही.त्यामुळे हे सहाय्य द्यावे तसेच शासनाने वारकऱ्यांना जे आर्थिक सहाय्य देण्याची घोषणा केली त्यामध्ये राष्ट्रीय किर्तनकारांचा समावेश करावा अशी मागणी करण्यात आली.यावेळी संस्थेचे अध्यक्ष ह. भ.प.सिताराम महाराज दबडे,सचिव राजाराम राऊत,गोपालराव शिंदे,सहसचिव लक्ष्मणराव इंगळे,गुलाबराव पांडे,सुरेश आमटे,संतोष धनवे,नंदाबाई शिंदे,दुर्गाबाई गिऱ्हे, कुसुम खडसे,कांचनबाई भुरके,वनिता धनवे,बबिता महाकाळ,नम्रता इंगळे,विमल सुर्वे,महानंदा मुंदे, सुमित्रा आमटे आदिंची उपस्थिती होती.

Web Title: Demand for financial assistance to older artists