उडदाच्या एकरी उत्पादनात घट; शेतकरी चिंताग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 20:34 IST2017-09-05T20:30:57+5:302017-09-05T20:34:00+5:30

यावर्षी पावसात सातत्य नसल्याचा जबर फटका उडीद उत्पादक शेतक-यांना बसला आहे. एकरी दोन ते तीन क्विंटल दरम्यान उत्पादन येत असल्याने शेतक-यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. 

Decrease in production of urad; Farmers nervous | उडदाच्या एकरी उत्पादनात घट; शेतकरी चिंताग्रस्त

उडदाच्या एकरी उत्पादनात घट; शेतकरी चिंताग्रस्त

ठळक मुद्देपावसात सातत्य नसल्याचा जबर फटका एकरी दोन ते तीन क्विंटल उत्पादन 

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : यावर्षी पावसात सातत्य नसल्याचा जबर फटका उडीद उत्पादक शेतक-यांना बसला आहे. एकरी दोन ते तीन क्विंटल दरम्यान उत्पादन येत असल्याने शेतक-यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. 
यावर्षी सुरूवातीपासूनच पावसाची अनियमितता शेतकºयांनी अनुभवली. मृग नक्षत्रात हजेरी लावल्यानंतर पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे काही शेतकºयांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागले. त्यानंतरही पावसात सातत्य राहिले नाही. ऐन शेंगा भरण्याच्या कालावधीतदेखील समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे आता उडीद उत्पादनात प्रचंड घट येत असल्याचे पळसखेडा येथील प्रगतशील शेतकरी सुभाष बाळासाहेब खरात यांनी सांगितले. उडीद पिकासाठी शेतकºयाला एका एकराला सरासरी साडेतीन ते चार हजार रुपये लागवड खर्च येते. आता उत्पादनात प्रचंड घट येत असल्याने शेतकºयांचे बजेट कोलमडत असल्याचे दिसून येते. एरव्ही चार ते सहा क्विंटलदरम्यान एकरी उत्पादन होत असते. यावर्षी एक ते तीन क्विंटलदरम्यान उत्पादन होत असल्याने उत्पादनातील घट जवळपास निम्म्यावर आली आहे. लागवड खर्चावर आधारित हमीभाव नसल्याने शेतकºयांच्या चिंतेत अधिकच भर पडत आहे. 

Web Title: Decrease in production of urad; Farmers nervous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.