शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

ठेचून ठार केलेला ‘तो’ इसम निघाला हैद्राबादचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2020 3:14 PM

अनोळखी इसम हैद्राबाद येथील असून चिखली झोलेबाबा येथील दोघांनी त्याची हत्या केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील सोयता येथे १७ डिसेंबर २०१९ रोजी ठेचून ठार केलेल्या तथा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. पोलिस तपासात ‘तो’ अनोळखी इसम हैद्राबाद येथील असून चिखली झोलेबाबा येथील दोघांनी त्याची हत्या केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. आव्हानात्मक स्वरूपातील या घटनेचा स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) पर्दाफाश केला.एलसीबीचे पोलिस निरीक्षक शिवाजी ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ डिसेंबर २०१९ रोजी सोयता येथील सुधाकर राऊत यांनी पोलिसांत दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले, की अतीक्रमीत जमिनीवरील तुरीच्या पिकात अनोळखी इसम मृतावस्थेत पडून आहे. त्याच्या डोक्यावरील केस व अंगावरील मास जनावराने खाल्ले असून चेहरा कुजलेल्या स्थितीत आहे. त्यावरून जऊळका पोलिसांनी घटनेची नोंद करून तपास सुरू केला. यादरम्यान जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी यांनी एलसीबीकडे प्रकरण वळते करून तपास करण्याचे निर्देश दिले. जउळका, सोयता, भोयता, पिंप्री अवगन, चिखली, शेलूबाजार आदीठिकाणी तपास करण्यात आला. अशात ३१ डिसेंबर रोजी शवविच्छेदन अहवालावरून ही हत्याच असल्याचे निष्पन्न झाल्याने अज्ञात आरोपींवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, गोपनिय माहितीवरून चिखली झोलेबाबा येथील शुभम खंडारे व त्याचा मित्र संजय जाधव यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, दोघांनीही गुन्ह्याची कबूली दिली. मृतक इसम हा हैदराबाद येथील राहणारा असून त्याचे नाव रमेशबाबू अच्छा आहे. मृतकास जमिनीतील धन (सोने) काढण्याची लालच देऊन शेतात नेले व त्याची हत्या केल्याचे आरोपींनी सांगितले. दोघांनाही ९ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

टॅग्स :washimवाशिमMurderखून