शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

‘सीआरपी’, ‘एचआरसीटी’चा आधार, कोरोनाबाधितांवर होताहेत उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:44 IST

सुनील काकडे वाशिम : गेल्या कित्येक दिवसांपासून कोरोना विषाणू संसर्गाचे संकट निवळल्याचे दर्शविण्यात येत आहे. आरोग्य विभागाकडून दैनंदिन जाहीर ...

सुनील काकडे

वाशिम : गेल्या कित्येक दिवसांपासून कोरोना विषाणू संसर्गाचे संकट निवळल्याचे दर्शविण्यात येत आहे. आरोग्य विभागाकडून दैनंदिन जाहीर केल्या जाणाऱ्या अहवालातही जिल्हा जवळपास कोरोनामुक्त झाल्याचे भासविण्यात येत आहे. प्रत्यक्षात मात्र चित्र वेगळेच असून, कोरोना चाचणीला सोयीस्कर बगल देऊन ‘सीआरपी ब्लड टेस्ट’ (सी रिॲक्टिव्ह प्रोटीन), ‘एचआरसीटी’च्या (फुफ्फुस स्कॅनिंग अहवाल) आधारे काही खासगी दवाखान्यांमध्ये बाधितांवर उपचार केले जात असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे आरोग्य विभागाने बहुतांश ठिकाणचे कोरोना चाचणी केंद्र बंद केले असून, कंत्राटी तत्त्वावर कार्यरत २६३ कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखविण्यात आल्याने पाणी कुठेतरी मुरत असल्याच्या शंकेला बळ येत आहे.

जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाने बाधित एकूण रुग्णसंख्येच्या आकड्याने सध्या ४१ हजारांचा पल्ला गाठला आहे. अर्थात शहरांसह ग्रामीण भागातही आरटीपीसीआर आणि अँटिजन चाचण्यांवर विशेष भर देण्यात आल्याने त्या पटीत बाधित रुग्ण निष्पन्न झाले; मात्र गेल्या काही दिवसांत दैनंदिन चाचण्यांच्या प्रमाणात घट झालेली आहे. परिणामी, बाधितांचा आकडाही घसरल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे खासगी दवाखान्यांमध्ये दाखल होणाऱ्या तीव्र स्वरूपाचा खोकला, तापेच्या एकाही रुग्णास कोरोना चाचणीचा सल्ला न देता ‘सीआरपी ब्लड टेस्ट’ आणि ‘एचआरसीटी टेस्ट’च्या आधारे उपचार केले जात असून, ज्या व्यक्ती कोरोना संसर्गाच्या शिकार ठरत आहेत, त्यांची खरी ‘हिस्ट्री’ लपविण्यात येत असल्याची चर्चा होत आहे.

................

‘सीआरपी’चा सल्ला झाला ‘काॅमन’

गेल्या काही दिवसांत वातावरणातील बदलाचा गंभीर परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर झाल्याचे दिसून येत आहे. सर्दी, खोकला, तापेच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून, अधिक काळापासून ताप आणि खोकला असणाऱ्या रुग्णांना कोरोना चाचणीऐवजी रक्ताच्या चाचणीतील ‘सीआरपी’ करण्याचा सल्ला दिला जात आहे. त्याचे प्रमाण वाढलेले असल्यास संबंधितांवर त्यानुसार उपचार केले जात असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले.

...................

कोरोना चाचणी केंद्र झाले बंद

वाशिम शहरातील मुलींचे वसतिगृह, सुरकुंडी रस्त्यावरील वसतिगृह, स्त्री रुग्णालयात सुरू केलेले कोरोना चाचणी केंद्र बंद करण्यात आले आहे. यासह अन्य ठिकाणी केवळ ग्रामीण रुग्णालयातच कोरोना चाचणीची सुविधा देण्यात आली आहे. दुसरीकडे प्रत्येकी तीन महिन्यांच्या कंत्राटी तत्त्वावर घेतलेल्या २६३ आरोग्य कर्मचाऱ्यांची सेवा संपुष्टात आणून त्यांना घरचा रस्ता दाखविण्यात आला. यामुळे डाटा एन्ट्री ऑपरेटर, स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आदी पदांवर कामे करायला पुरेसे मनुष्यबळच नसून ही कामे ठप्प झाली आहेत.

...................

‘सीआरपी’च्या दैनंदिन ४०० चाचण्या

‘सीआरपी’ ही चाचणी कोविड-१९ च्या उपचारांत अत्यंत उपयुक्त ठरलेली चाचणी आहे. एखादा बाह्य विषाणू किंवा संसर्गामुळे शरीरात रासायनिक प्रक्रिया सुरू होते. यामुळे शरीरात सीआरपी निर्माण होऊन इन्फेक्शनची पातळी वाढते. दरम्यान, कोरोनाचे संकट उच्च पातळीवर असताना एकट्या वाशिम शहरात दैनंदिन १४०० ते १५०० ‘सीआरपी टेस्ट’ होत असत. हे प्रमाण सध्याही ४००च्या आसपास असल्याचे शहरातील ८ एम.डी. व २० डीएमएलटी पॅथाॅलाॅजीमधील आकडेवारीवरून दिसून येत आहे.

..............

कोट :

कोरोना संसर्गाच्या संकट काळात शहरातील खासगी दवाखान्यांना कोविड केअर सेंटरची मान्यता दिली होती. रुग्णसंख्या नियंत्रणात आल्यानंतर ती मध्यंतरी रद्द करण्यात आली. असे असतानाही आरटीपीसीआर किंवा ॲंटिजन न करता केवळ ‘सीआरपी’ किंवा ‘एचआरसीटी स्कोअर’च्या आधारे कोरोनाबाधितांवर उपचार करणे चुकीचे आहे. याप्रकरणी चाैकशी केली जाईल. दोषी आढळणाऱ्यांची गय केली जाणार नाही.

- डाॅ. मधुकर राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम