शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांची कोटी-कोटी उड्डाणे!

By admin | Updated: October 1, 2014 00:25 IST

बुलडाणा जिल्ह्यातील आमदारांच्या मालमत्तेचा तपशीलही लोकांसमोर.

अनिल गवई / हर्षनंदन वाघ / बुलडाणाखामगाव : विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमिवर सर्व उमेदवारांनी उमेदवारी अर्जासोबत मालमत्तेचा तपशीलही प्रतिज्ञापत्राद्वारे निवडणूक विभागाकडे सादर केला आहे. त्यानिमित्ताने जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांचे प्रतिनिधीत्व करणार्‍या आमदारांच्या मालमत्तेचा तपशीलही लोकांसमोर आला आहे. त्याचा आढावा घेतला असता, आमदारांच्या संपत्तीत घसघशीत वाढ झाल्याचे दिसून येते. दिलीपकुमार सानंदा हे २00९ साली तिसर्‍यांदा खामगाव विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यावेळी त्यांनी निवडणूक विभागाकडे सादर केलेल्या तपशीलानुसार त्यांच्याकडे (पत्नी-अपत्यांसह)े एकूण चल-अचल संपत्ती ३ कोटी ७१ लाख १६ हजार ४९९ रुपये होती. २0१४ मध्ये आ.सानंदा आणि त्यांच्या पत्नी तसेच अवलंबितांची एकूण संपत्ती ७ कोटी ४६ लाख ५२ हजार ११३ रुपये असल्याचे त्यांनी उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञालेखावरुन दिसून येत आहे. त्यानुसार गेल्या पाच वर्षात त्यांच्या मालमत्तेत एकुण ३ कोटी ७५ लाख ३५ हजार ६१४ रुपयांची वाढ झाली आहे.मलकापूरचे आमदार चैनसुख संचेती यांनी २00९ साली विधानसभा निवडणुकीच्यावेळी सादर केलेल्या मालमत्तेच्या तपशीलानुसार, त्यांच्या, तसेच पत्नीच्या नावे एकूण २ कोटी १६ लाख ९३ हजार २३0 रुपयांची मालमत्ता होती. यावर्षीच्या निवडणुकीसाठी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आ. संचेती यांची (पत्नी आणि त्यांच्यावरील दोन अवलंबित व्यक्तींसह) १२ कोटी ९६ लाख ३९ हजार ६५६ रुपयांची मालमत्ता असल्याचे नमूद केले आहे. पाच वर्षात त्यांच्या मालमत्तेत १0 कोटी ७९ लाख ४६ हजार ४२६ रूपयांची वाढ झाली आहे. बुलडाणा विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमिवर सर्व उमेदवारांनी उमेदवारी अर्जासोबत मालमत्तेचा तपशीलही प्रतिज्ञापत्राद्वारे निवडणूक विभागाकडे सादर केला असल्याने हा तपशील लोकांसमोर आला आहे. त्याचा आढावा घेतला तर काही उमेदवार लखपती व काही करोडपती असल्याचे दिसून येत आहे.शिवसेनेकडून सलग तीन वेळा आमदार राहिलेले विजय हरिभाऊ शिंदे चवथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांनी भरलेल्या शपथपत्रात ते कोट्यधीश असल्याचे पुढे आले आहे. त्यांच्याकडे १ कोटी २८ लाख ८0 हजार २१९ रूपये संपत्ती असल्याचे त्यांनी २00९ मध्ये जाहीर केलेले आहे. तर आता २0१४ मध्ये त्यांचेकडे ४ कोटी ४ लाख ६८ हजार १११ रूपये संपत्ती असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे जाहीर केले आहे. येते.