शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना नियंत्रणात; पण लोककलावंत उपेक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:49 IST

कोरोना विषाणू संसर्गाच्या वैश्विक महामारीचा राज्यातील सर्वच जिल्ह्यांना मोठा फटका बसला. संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी अधूनमधून कडक लाॅकडाऊन लावण्यासोबतच शासनाने ...

कोरोना विषाणू संसर्गाच्या वैश्विक महामारीचा राज्यातील सर्वच जिल्ह्यांना मोठा फटका बसला. संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी अधूनमधून कडक लाॅकडाऊन लावण्यासोबतच शासनाने सार्वजनिक कार्यक्रम, उत्सवांवर बंदी लादली. यासह लोककलावंतांमार्फत शासकीय योजनांच्या जनजागृतीलाही ‘ब्रेक’ लावण्यात आला. यामुळे कार्यक्रमांच्या माध्यमातून मिळणाऱ्या मानधनावर उदरनिर्वाह चालत असलेले लोककलावंत व त्यांच्या कुटुंबावर उपासमार ओढवली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची स्थिती बहुतांशी नियंत्रणात असल्याने शासनाने पुन्हा एक वेळ नव्या दमाने लोककलावंतांमार्फत योजनांच्या जनजागृतीचे कार्यक्रम सुरू करावे, अशी मागणी कलावंतांमधून होत आहे.

..................

कोट :

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गेल्या १८ महिन्यांपासून शासकीय योजनांच्या जनजागृतीचे सर्वच कार्यक्रम बंद आहेत. यामुळे लोककलावंतांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. आता कोरोना नियंत्रणात असल्याने इतर सर्वच व्यवहार सुरू झाले, त्या धर्तीवर शासनाने जनजागृतीचे कार्यक्रम सुरू करून लोककलावंतांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा आहे.

- संतोष खडसे, लोककलावंत, वाशिम