शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प आता पाकिस्तानचेही ऐकेनात, इराणला दिली उघड धमकी; म्हणाले, “करार होत नाही तोपर्यंत...”
2
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
3
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
4
Video - संतापजनक! "तू क्यूट दिसतेस, एकटीच राहतेस का?"; रॅपिडो ड्रायव्हरचा तरुणीला मेसेज
5
IPL 2026: सूर्यकुमार यादवचा 'फ्लॉप शो' सुरूच, ६ पैकी ५ सामन्यात 'फेल'; MI संघाबाहेर काढणार?
6
Mamata Banerjee : "माझं विमान रनवेवर मुद्दाम ३० मिनिटं थांबवलं, याचा बदला घेऊ"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
7
Vastu Tips: वारंवार येणारे अडथळे आणि आर्थिक चणचण? वास्तुशास्त्राचे 'हे' सोपे उपाय ठरतील रामबाण!
8
Latest Marathi News LIVE Updates: "ट्रम्प सर्वाधिक भ्रष्ट आणि निष्ठूर माणूस", माजी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचे टीकास्त्र
9
लग्नसराईपूर्वी सोन्या-चांदीत घसरण; जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर...
10
ट्रम्प यांच्या धमकीवर इराणचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही अजून सर्व पत्ते उघडले नाहीत”
11
Unseasonal Rain: ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट... पनवेल, नवी मुंबई, रायगडात पावसाची हजेरी, नागरिकांची तारांबळ
12
Raigad Crime: तरुणीचा रक्ताच्या थारोळ्यात विवस्त्र अवस्थेत सापडला मृतदेह; लॉजमध्ये हत्या करून आरोपी फरार
13
धडधड वाढली, युद्ध पुन्हा पेटणार? नेतन्याहू म्हणाले, "इराणमधील आमचे मिशन अजून बाकी आहे"; ट्रम्प यांचीही धमकी
14
“जिथे कोणी जात नाही तिथे मी जातो”; DCM शिंदेंचा दुर्गम भागापर्यंत विकास पोहोचवायचा निर्धार
15
IPL 2026: अवघ्या ३० रूपयांनी बदललं Ashwani Kumarचं नशीब; ४ बळी घेत Mumbai Indiansला जिंकवलं!
16
Shapoor Zadran: अफगाणिस्तान क्रिकेटचा एकेकाळचा आधारस्तंभ, आज मृत्युशी देतोय झुंज, ओळखणंही झालं कठीण!
17
आजचे राशी भविष्य: २१ एप्रिल २०२६: हाती घेतलेली कामे पूर्ण होतील, 'या' राशींना धनलाभाचा योग
18
“महिला आरक्षणावरील चर्चेसाठी CM फडणवीसांनी PM मोदींनाही आणावे”; प्रणिती शिंदेंचे प्रतिआव्हान
19
Supreme Court: फक्त उच्च शिक्षण पुरेसे नाही, सरकारी नोकरीसाठी सर्वोच्च न्यायालयाने घातली अट!
20
Learning License: लर्निंग लायसन्स प्रक्रिया पुन्हा 'ऑफलाईन'; गैरप्रकार रोखण्यासाठी आरटीओचे पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

कारंजाच्या पोलिस वसाहतीतील घरांची पडझड

By admin | Updated: September 13, 2014 23:03 IST

जनतेचे रक्षकच असुरक्षित : वसाहतीत मुलभूत सुविधांचा अभाव.

कारंजालाड : निसर्गाच्या सानिध्यात उंच भागावर वसलेल्या स्थानिक पोलीस वसाहतीमधील घरांची मोठय़ा प्रमाणात पडझड झाली आहे. त्यामुळे या वसाहतीत राहणार्‍या कर्मचार्‍यांच्या कुटुंबियांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. निवासस्थाने अतिशय मोडकळीस आल्याने ३५ निवासस्थानापैकी केवळ २१ कुटुंब या वसाहतीत राहत आहेत. ह्यसदरक्षणाय खलनिग्रहणायह्ण हे ब्रिद घेवून जनतेच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटणार्‍या पोलीसांच्या सुरक्षिततेबाबत शासन किती बेफिकीर असू शकते याचा उत्तम नमुना म्हणजे येथील पोलीस वसाहत होय. पोलिस वसाहतीची निर्मिती ही स्वातंत्र्यपूर्व असून सद्यस्थितीत बोटावर मोजण्याइतकेच निवासस्थान राहण्या योग्य असल्याचे दिसुन येते. घराच्या भिंतींना तडे गेले असून घरावरील कवेलू फुटले आहेत. याशिवाय घराचा डोलारा सांभाळणारे लाकूडही कमकुवत झाले आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात या निवासस्थानांना धारा लागतात. तसेच दरवर्षीच्या पावसामुळे घरांचे दार, खिडक्या कुजल्याने त्याच्या फाटा तुटल्या आहेत. त्यामधून सरपटणारे प्राणी घरात घुसण्याची भीतीही कर्मचार्‍यांच्या कुटुंबियांना लागून आहे. पोलिस वसाहतीमधील कुटुंबियांसाठी शासनाने स्वतंत्र शौचालय उभारले आहे. मात्र सदर शौचालयही अखेरच्या घटका मोजत आहेत.