शहरं
Join us  
Trending Stories
1
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
2
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
3
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
4
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
5
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
6
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
7
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
8
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
9
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
10
'ये जवानी है दिवानी' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार; म्हणाली...
11
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
12
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
13
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
14
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
15
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
16
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
17
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
18
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
19
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
20
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना आपत्ती व्यवस्थापनाला नागरिकांचा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 17:24 IST

नागरिकांनी शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच सार्वजनिक स्थळी जाणे शक्यतोवर टाळले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ‘कोरोना व्हायरस’च्या संभाव्य धोक्यापासून सावधगिरीचा उपाय म्हणून, जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच सार्वजनिक स्थळी जाणे शक्यतोवर टाळले आहे. सर्व धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमही रद्द केले असून, काहींनी विवाह समारंभ पुढे ढकलले आहेत.जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग झालेला रुग्ण आढळला नसला तरी सावधगिरीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी गर्दीच्या कार्यक्रमांना प्रतिबंध घालण्याचे आदेश यापूर्वीच दिले होते. त्यानुषंगाने जिल्ह्यात ३१ मार्चपर्यंत सभा, मेळावे, सामाजिक कार्यक्रम, यात्रा, जत्रा, उत्सव, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा आदी गर्दीचे कार्यक्रम रद्द केले आहेत. एरव्ही दररोज सकाळच्या वेळी गर्दीने गजबजणारे जिल्हा क्रीडा संकुल आता सामसुम दिसत आहे. ग्रामीण तसेच शहरी भागातील शाळा-महाविद्यालये, चित्रपटगृहे बंद ठेवल्याने गर्दीला आपसूकच पायबंद असला आहे. खूपच गरज असेल तरच कामानिमित्त शासकीय, निमशासकीय कार्यालयात जावे अन्यथा इ-मेल, व्हॉटस्अपच्या माध्यमातून निवेदन, तक्रारी मांडाव्या असे आवाहनही जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी १६ मार्चला केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत शासकीय, निमशासकीय कार्यालयात जाणे नागरिकांनी टाळल्याने गर्दी कमी झाल्याचे १८ मार्च रोजी दिसून आले.  कुकुटपालन व्यवसायाला आधार देण्याची मागणीरिसोड : कोरोनाच्या भीतीमुळे उद्धवस्त झालेल्या कुकुटपालन व्यवसायाला सहाय्य मिळावे, व्यावसायिकांना शासनाने आधार द्यावा, अशी मागणी भूमिपूत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णूपंत भुतेकर यांनी १८ मार्च रोजी शासनाकडे केली. कोरोना व्हायरसच्या चुकीच्या अफवेमुळे जिल्ह्यातील शेतीपुरक असणाºया कुकुटपालन व्यवसायाचे पुर्ण  कंबरडे मोडले गेले. कुकुटपालन व्यवसाय करणाºया शेतकºयांचे कधी नव्हे एवढे नुकसान झाले असुन शासनाने  व्यवसाय वाचविण्यासाठी तथा शेतकºयांना धीर देण्यासाठी व्यवसाय करणाºयांच्या पाठिशी उभे राहावे, अशी मागणी भुतेकर यांनी केली.  विवाह समारंभ पुढे ढकलले ‘कोरोना व्हायरस’च्या पृष्ठभूमीवर गर्दी होऊ नये म्हणून काहींनी विवाह समारंभ वर-वधूच्या कुटुंबियापुरते मर्यादीत ठेवले तर काहींनी विवाह समारंभ पुढे ढकलले आहेत.

टॅग्स :washimवाशिमCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस