शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

मालवाहू वाहन उलटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:46 IST

----------- पथदिव्यांअभावी ग्रामस्थांना अडचणी वाशिम : निम्मा पावसाळा उलटला, तरी ग्रामीण भागांतील अनेक गावांत बंद असलेले पथदिवे सुरू करण्याबाबत ...

-----------

पथदिव्यांअभावी ग्रामस्थांना अडचणी

वाशिम : निम्मा पावसाळा उलटला, तरी ग्रामीण भागांतील अनेक गावांत बंद असलेले पथदिवे सुरू करण्याबाबत ग्रामपंचायती उदासीन असून, पथदिवे बंद असल्याने ग्रामस्थांना रात्रीच्या वेळी अडचणींचा सामना करावा लागत आहे.

------------------

रोही करत आहेत पिके फस्त

वाशिम: खरीप हंगामातील पिके आता चांगलीच बहरली आहेत, परंतु आता वन्यप्राणी या पिकांवर ताव मारत आहेत. यात रोहिंचे कळप शेकडो एकर क्षेत्रातील शिवारात धुडगूस घालून सोयाबीन, मूग, उडदाची पिके फस्त करीत असल्याचे चित्र पाहायला मिळते.

------------------

‘रोहयो’च्या कामांची तयारी

वाशिम: जिल्ह्यात तीन लाखांहून अधिक जॉब कार्डधारक मजूर आहेत. या कामगारांसाठी रोहयोची कामे सुरू करण्याची तयारी रोहयो विभागाने केली आहे. यासाठी ग्रामपंचायतींच्या माध्यमातून कामाची मागणी नोंदविण्याचे आवाहन केले जात आहे.

---------

शेतकऱ्यांची वहिवाट बंद

वाशिम: मानोरा तालुक्यातील इंझोरी शिवारात पाणंद रस्त्यांच्या कामाला सहा महिन्यांपूर्वीच मंजुरी मिळाली, परंतु अपुऱ्या निधीमुळे या रस्त्यांची कामे सुरू होऊ शकली नाहीत. आता या रस्त्यांवर चिखल झाल्याने शेतकऱ्यांची वहिवाट बंद पडली आहे.

--------------

झुकलेल्या खांबामुळे अपघाताची शक्यता

वाशिम: मंगरुळपीर तालुक्यातील ग्रामीण भागांत शेतकऱ्यांना वीजजोडणीसाठी उभारलेले वीज खांब पाऊस आणि वादळी-वाऱ्यामुळे झुकले आहेत. एखादे वेळी खांब कोसळल्यास अपघाताची भीती असल्याने, हे खांब सरळ करण्याची मागणी होत आहे.

------------------

बीएसएनएलची कनेक्टिव्हिटी खंडित

वाशिम: गत काही दिवसांपासून भारत संचार निगम लिमिटेडच्या इंटरनेटची कनेक्टिव्हिटी वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे आपले सरकार केंद्रांतील कामे खोळंबून ग्रामस्थ, शेतकरी, विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.