शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

पुलाच्या कडा खचल्या!

By admin | Updated: November 21, 2014 01:25 IST

रस्ते विकास महामंडळ दुर्लक्ष

मंगरुळपीर : नागपूर-औरंगाबाद द्रुतगती मार्गावरील तर्‍हाळा गावानजीक पुलाच्या कडा खचल्या असून, या रस्त्यावर मोठे-मोठे खड्डे पडले आहे. परिणामी अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे; मात्र याकडे रस्ते विकास महामंडळ दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. नागपूर ते औरंगाबाद द्रुतगती मार्गाच्या शेलूबाजार, तर्‍हाळा, लाठी वळण रस्त्याचे बांधकाम लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे अर्धवट अवस्थेत पडले आहे. वळण रस्त्याची निर्मिती व्हावी, अशी मागणी मागील कित्येक वर्षांपासून होत असताना लोकप्रतिनिधी सातत्याने पाठपुरावा करीत नाही. तसेच प्रशासन सुस्त असल्याने या तीनही गावातील नागरिकांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. दरम्यान, तर्‍हाळानजीकच्या अरुंद पुलाजवळ आजपर्यंत तीन वाहनचालकांचा अपघातामुळे बळी गेला.सदर घटना संबंधित विभागाच्या वेळकाढू धोरणामुळे घडल्याचा आरोप नागरिक करीत आहे. आता त्याच ठिकाणच्या पुलाच्या कडा तुटून पडल्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, पुलाच्या कडा खचल्याची माहिती रस्ते विकास महामंडळाला खरेच नसावी का, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. यापूर्वी त्याच भागातील रस्त्याची डागडुजी झाली. त्यावेळी अरुंद पुलाच्या दोन्ही बाजूंनी सुरक्षा भिंत घेणे आवश्यक होते; मात्र त्या बाबीकडे दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी आज द्रुतगती मार्गावर सुसाट वेगाने धावणार्‍या वाहनधारकांना अरुंद पुलाची कल्पना येत नाही. अचानक त्या ठिकाणी चालकाची धांदल उडाल्याचे प्रकार घडत आहेत. द्रुतगती मार्गाच्या निर्मितीनंतर रस्ते विकास महामंडळाने या भागातील रस्त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. वळण रस्त्यासंदर्भात ठोस पाठपुरावा केल्या जात नाही. जिल्हय़ातील लोकप्रतिनिधीने वळण रस्त्याबाबत पाठपुरावा केला, तर निश्‍चित यश पदरी पडू शकते; परंतु या गंभीर समस्याकडे सर्व स्तरावरून दुर्लक्ष होत आहे