बंजारा समाजाची काशी पोहरादेवीला रेल्वे स्टेशन मंजूर

By Admin | Updated: December 3, 2014 01:31 IST2014-12-03T01:31:39+5:302014-12-03T01:31:39+5:30

वर्धा-यवतमाळ-नांदेड जाणारा २८0 कि.मी.चा लोहमार्ग प्रस्तावित.

Banjara community approved Kashi Pohardevi railway station | बंजारा समाजाची काशी पोहरादेवीला रेल्वे स्टेशन मंजूर

बंजारा समाजाची काशी पोहरादेवीला रेल्वे स्टेशन मंजूर

वाशिम : मंजूर नवीन रेल्वे मार्गांतर्गत बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी या ठिकाणी रेल्वे स्टेशनला मंजुरात देण्यात आली आहे.
वर्धा येथून यवतमाळ मार्गे नांदेडला जाणारा २८0 कि.मी. अंतर असलेला व २८00 कोटी अंदाजपत्रक असलेला नवीन रेल्वेमार्ग मंजूर झालेला असून्,ा या नवीन रेल्वे मार्गाकरिता जमीन संपादनाचे काम केंद्र शासनाकडून सुरू झाले आहे. या रेल्वे मार्गांतर्गत बंजारा समाजाची काशी असलेले संत सेवालाल महाराजांचे पवित्र देवस्थान पोहरादेवी असून, संपूर्ण देशभरातून बंजारा समाजाचे भक्तगण येथे दर्शनाकरिता येत असतात. या रेल्वे मार्गावर पोहरादेवी या ठिकाणी रेल्वे स्टेशन व्हावे, याकरिता खासदार भावना गवळी यांचा पाठपुरावा सुरू होता. नुकत्याच रेल्वे बोर्ड नवी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत रेल्वे बोर्डाचे आर.के. गोयल यांनी पोहरादेवी स्टेशनला मंजुरात दिली असल्याची माहिती खासदार भावना गवळी यांनी प्रसिध्दीपत्रकातून दिली.




 

Web Title: Banjara community approved Kashi Pohardevi railway station