शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
2
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
3
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
4
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
5
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
6
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
7
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
8
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
9
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
10
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
11
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
12
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
13
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
14
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
15
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
16
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
17
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
18
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
19
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
20
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्जवाटपाच्या उद्दिष्टाला बॅकांचा ‘खो’

By admin | Updated: December 24, 2014 00:39 IST

वाशिम जिल्ह्यातील प्रकार; जिल्हा बँकेचा भोपळाच : राष्ट्रीयकृत, कर्मशिअल तथा ग्रामीण बॅकांचाही शेतक-यांशी असहकार.

शिखरचंद बागरेचा / वाशिम: खरिप हंमागातील नापीकीमुळे हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांना रब्बीच्या पेरणींसाठी पिक कर्ज वाटण्यात बँकानी आखडता हातच घेतला असल्याची माहीती हाती आली आहे. नोव्हेंबर अखेरपर्यंंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने एकाही शेतकर्‍यांना पिक कर्ज दिले नाही, तर राष्ट्रीयकृत बँकानीही कर्ज वाटपाच्या उद्दिष्ट पूर्तीला खो दिल्याचेच आकडेवारीवरून दिसून येत आहे. विविध राष्ट्रीयकृत बँकाकडुन ३0 नोव्हेंबर पर्यंंत वाटण्यात आलेल्या पिक कर्जाची टक्केवारी केवळ १९ एवढीच आहे.जिल्ह्यात बारा राष्ट्रीयकृत , तीन खासगी व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांद्वारे शेतकर्‍यांना पिक कर्ज मिळणे अपेक्षी असते. खरिप हंगामात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक दरवर्षीच उदिष्टापेक्षा दिडपट अथवा त्याही पेक्षा अधिक पिक कर्ज वाटते. राष्ट्रीयकृत बँका मात्र खरिप असो अथवा रब्बी नेहमीच पिक कर्जासाठी आखडता हात घेतात. यंदाच्या रब्बी हंगामातही पिक कर्ज वाटपात बॅकानी येरे माझ्या मागल्या ची भूमिका कायम ठेवली आहे. यंदाच्या रब्बी हंगामासाठी राष्ट्रीयकृत बँकाना ५१ कोटी रूपयांचे उद्दिष्ट ठरवून दिले होते. मात्र सदर बँकानी ३0 नोव्हेंबर पर्यंंत केवळ १९८७ खातेदारांना नऊ कोटी ५९ लाख रूपयांचेच कर्ज वितरित केले. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया अग्रस्थानी आहे. सदर बॅकेने नोव्हेंबर अखेर पर्यंंत ७४७ शेतकरी खातेदारांना तीन कोटी ८५ हजार रूपये कर्ज वाटप केले आहे. तर सर्वात पिछाडीवर सिंधीकैट बॅक आहे. या बॅकेने केवळ दोन शेतकर्‍यांना दोन लाख रूपयांचे कर्ज वाटत केले आहे. राष्ट्रीयकृत बँकाप्रमाणेच कर्मशिअल बॅकांची परिस्थिती आहे. आयसीआयसीआय बॅकेचा अपवाद वगळता अन्य बॅकांनी शेतकर्‍यांना रब्बीचे कर्ज वाटपात ठेंगाच दाखविला आहे.*जिल्हा बॅकेचा भोपळाचयंदाच्या खरिप हंमागात १३0 टक्के पिक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करणार्‍या दि. अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने नोव्हेंबर अखेर पर्यंंत एकाही शेतकर्‍यांला रब्बी हंगामासाठी पिक कर्ज दिले नव्हते. शेतकर्‍यांकडुन मागणी नसल्यामुळेच बँक कर्ज वितरीत करू शकली नाही अशी माहीती आता समोर आली आहे. वाशिम जिल्ह्यातील शेतकरी खरिप हंगामामध्ये पिक कर्ज योजनेचा लाभ घेतात. मार्च महिन्यात कर्जाचा भरणा केल्यानंतर पून्हा एप्रिल अथवा त्यांनतर शेतकर्‍यांना बँक कर्जपुरवठा करते.