शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
3
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
4
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
5
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
6
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
7
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
8
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
9
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
10
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
11
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
12
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
13
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
14
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
15
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
16
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
17
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
18
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
19
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
20
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

१२५ जलाशयात सरासरी ७२ टक्के जलसाठा!

By admin | Updated: September 16, 2016 03:02 IST

रिसोड तालुक्यात सर्वात कमी जलसाठा : शेतकरी चिंतातूर.

वाशिम, दि. १५- जिल्ह्यातील एकूण १२५ प्रकल्पांत १५ सप्टेंबरपर्यंत सरासरी ७२ टक्के जलसाठा असल्याची नोंद जलसंपदा विभागाच्या दप्तरी आहे. यावर्षी रिसोड तालुक्यात आतापर्यंंत अपेक्षित सरासरीपेक्षा १९ टक्के जास्त पाऊस झाला. तथापि, एकूण १७ प्रकल्पांत सरासरी केवळ २५ टक्के जलसाठा असल्याने शेतकर्‍यांच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे. याऊलट वाशिम तालुक्यात अपेक्षीत सरासरीएवढाही पाऊस नसताना, एकूण ३२ प्रकल्पांत सरासरी ८९ टक्के जलसाठा आहे. गत तीन वर्षांंपासून वाशिम जिल्ह्यात समाधानकारक पाऊस नसल्याने जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून घोषित होत आला आहे. यावर्षी पावसाने सुरुवातीला दमदार प्रवेश करून सर्वांंनाच सुखद धक्का दिला. रिसोड तालुक्यातील जलप्रकल्पांच्या परिसरात दमदार पाऊस न झाल्याने आतापर्यंंत केवळ सरासरी २५ टक्के जलसाठा आहे. शेतकर्‍यांसाठी सिंचनाच्या दृष्टिकोनातून ही धोक्याची घंटा आहे. रिसोड तालुक्यात आतापर्यंंत एकूण ७७३ मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे. हा पाऊस अपेक्षीत सरासरीपेक्षा १९ टक्क्याने जास्त आहे. याऊलट वाशिम तालुक्यात अपेक्षित सरासरीपेक्षा पाच टक्के पाऊस कमी पडला आहे. वाशिम तालुक्यात आतापर्यंंत ८२५ मिमी पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात ७८८ मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे; मात्र या तालुक्यातील जलप्रकल्पांत सरासरी ८९ टक्के जलसाठा असल्याने शेतकर्‍यांसाठी ही आनंदाची बाब आहे. मानोरा तालुक्यातील एकूण २३ प्रकल्पांत सरासरी ८३ टक्के जलसाठा आहे.मंगरुळपीर तालुक्यातील एकूण १५ प्रकल्पांत सरासरी ८२ टक्के जलसाठा आहे. मालेगाव तालुक्यातील एकूण २१ प्रकल्पांत सरासरी ६४ टक्के जलसाठा आहे. कारंजा तालुक्यातील एकूण १४ प्रकल्पांत सरासरी ५९ टक्के जलसाठा आहे. रिसोड तालुक्यातील वरूड बॅरेजमध्ये केवळ १00 टक्के जलसाठा असून, त्याखालोखाल गणेशपूर ८५, कुकसा ७८, पाचंबा ६६, जवळा ५७, वाडी रायताळ ५१, नेतन्सा ५0, हराळ ४६, मांडवा ४१, गौंढाळा ३८ टक्के जलसाठा आहे. उर्वरित सर्व प्रकल्पांत ३0 टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा आहे.