वंचित आघाडीच्या तालुका कार्यकारिणींकडे लक्ष !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:49 IST2021-09-17T04:49:40+5:302021-09-17T04:49:40+5:30

आगामी निवडणुका लक्षात घेता जिल्ह्यात सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. वंचित बहुजन आघाडीने तालुका व शहर कार्यकारिणी गठित ...

Attention to the taluka executives of the deprived front! | वंचित आघाडीच्या तालुका कार्यकारिणींकडे लक्ष !

वंचित आघाडीच्या तालुका कार्यकारिणींकडे लक्ष !

आगामी निवडणुका लक्षात घेता जिल्ह्यात सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. वंचित बहुजन आघाडीने तालुका व शहर कार्यकारिणी गठित करण्यासाठी गत आठवड्यापासून तालुकानिहाय आढावा घेतला. जवळपास ४० जणांचा समावेश असलेल्या तालुका कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांची नावेही निश्चित झाली आहे. मात्र, अद्याप याची घोषणा करण्यात आली नाही. अंतिम यादी लवकरच पक्षाच्या वरिष्ठांकडे मंजुरीसाठी पाठविली जाणार आहे. वरिष्ठांकडून या यादीला मंजुरी मिळाल्यानंतर अधिकृत घोषणा केली जाणार असल्याचे विश्वसनीय सूत्र आहे

................

कोट

तालुका व शहर कार्यकारिणी गठित करण्याची कार्यवाही जवळपास पूर्ण झाली आहे. या कार्यकारिणीत जवळपास ४० जणांचा समावेश राहणार आहे. अंतिम यादी ही मंजुरीसाठी वरिष्ठांकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतरच अधिकृत घोषणा केली जाईल.

- सिद्धार्थ देवरे,

जिल्हा महासचिव,

वंचित बहुजन आघाडी

Web Title: Attention to the taluka executives of the deprived front!