डोक्यात सत्तूर घालत जिवे मारण्याचा प्रयत्न; मंगरुळपीर शहरातील घटना
By संतोष वानखडे | Updated: March 19, 2024 19:02 IST2024-03-19T19:01:08+5:302024-03-19T19:02:17+5:30
डोक्यात लोखंडी सत्तूर मारून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगरुळपीर शहरात घडली.

डोक्यात सत्तूर घालत जिवे मारण्याचा प्रयत्न; मंगरुळपीर शहरातील घटना
वाशिम: डोक्यात लोखंडी सत्तूर मारून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगरुळपीर शहरात घडली. या प्रकरणी पोलिसांनी मंगळवार १९ मार्चला दुपारी एकावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी सैय्यद अबरार सय्यद सादिक (वय ५४ वर्षे) रा. नगिना मश्जिदजवळ मंगरूळपीर यांनी तक्रार दिली की, मंगळवार १९ मार्चला सकाळी ९:३० वाजताच्या सुमारास फिर्यादीचा भाऊ सय्यद आजम सय्यद सादिक (वय ५५ वर्षे) हा त्याचे घरासमोर उभा असताना आरोपी सखाउल्ला खा ऊर्फ जिगलिया अमिर खान (वय ४८ वर्षे) रा. नगिना मश्जिदजवळ मंगरूळपीर याने 'तू माझी बायको परत आणून का देत नाही.
या कारणावरून फिर्यादीच्या भावाला जिवे मारण्याचे उद्देशाने त्याच्या डोक्यावर लोखंडी सत्तूर मारून गंभीर जखमी केले आणि तो पुन्हा मारण्यासाठी गेला असता फिर्यादीच्या भावाने तो वार हाताने अडवल्यामुळे हाताला सुद्धा जखम झाली, अशा तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.