शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
4
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
5
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
6
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
7
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
8
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
9
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
10
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
11
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
12
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
13
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
14
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
15
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
16
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
17
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
18
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
19
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
20
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
Daily Top 2Weekly Top 5

अंनिसचे ‘आत्मक्लेश’ आंदोलन

By admin | Updated: November 21, 2014 01:06 IST

रक्ताने लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र

वाशिम : महाराष्ट्रातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रणेते दिवंगत नरेंद्र दाभोळकर यांचे मारेकरी तथा जवळखेड येथील दलित कुटुंबाची हत्या करणार्‍यांना अटक करण्यात राज्य शासन अपयशी ठरत असल्याचा आरोप करीत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी २0 नोव्हेंबरला स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आत्मक्लेश आंदोलन केले. यावेळी अंनिसच्या कार्यकर्त्यांनी स्वत: रक्ताने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या दोन्ही घटनेचा निषेध नोंदविला.महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची हत्या होऊन तब्बल दीड वर्षाचा कालावधी उलटला असला, तरी त्यांच्या मारेकर्‍यांना पकडण्यात अद्याप पोलिसांना यश आले नाही. अहमदनगर जिल्ह्यातील जवखेड येथील दलित कुटुंबाची निर्घृण हत्या करणारेही अद्याप मोकाट आहेत. या दोन्ही घटनांचा निषेध नोंदविण्यासाठी अंनिसच्या कार्यकर्त्यांनी आंबेडकर चौकात आत्मक्लेश आंदोलन केले. यावेळी पी. एस. खंदारे, रामप्रभू सोनोने, बबनराव मोरे, नामदेव दीपके, सदानंद तायडे आदींची उपस्थिती होती.