शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

कृषीपंप वीज जोडणीची प्रक्रिया रखडली

By admin | Updated: June 26, 2014 02:29 IST

कारंजा तालुक्याला २३१ लाभार्थींचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत केवळ ९0 वीजजोडणीचे काम पूर्णत्वाकडे

कारंजा : बिलाच्या थकित रकमेपोटी तातडीने कृषीपंप जोडणीचा दंडुका उगारणारी वीज वितरण कंपनी कर्तव्याच्या बाबतीत मात्र गाढ झोपी गेली असल्याची बाब कृषीपंप जोडणीच्या विलंबाने उजेडात आणली आहे. दीड वर्षानंतरही वीज वितरण कंपनीला कृषीपंप जोडणीचा ५0 टक्के आकडाही गाठता आला नसल्याची शोकांतिका आहे. नवीन ऑर्डर नसल्याने कृषीपंप जोडणीचे काम ठप्प पडले आहे.
दारिद्रय़रेषेखाली जीवन जगणार्‍या अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील शेतकर्‍यांचे जीवनमान उंचाविण्याच्या दृष्टिकोनातून १९८२ पासून राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये विशेष घटक योजना राबविली जात आहे. या योजनेंतर्गत नवीन विहिरीसह विविध प्रकारच्या १४ ते १६ बाबींवर अनुदान दिले जाते. २0११-१२ मध्ये विविध योजनेंतर्गत घेतलेल्या विहिरींवर मोफत वीजपंप बसविणे आणि वीजजोडणी देण्याच्या उपक्रमाचा यामध्ये समावेश करण्यात आला. त्यानुसार वाशिम जिल्ह्यात १३२५ कृषीपंप व वीजजोडणीचे उद्दिष्ट मिळाले होते. वीज जोडणीसाठी प्रत्येक लाभार्थी ६६५0 रुपयाप्रमाणे ८८ लाख ११ हजार २५0 रुपये शुल्क एप्रिल ते मे २0१२ मध्येच कृषी विभागाने वीज वितरण कंपनीच्या खात्यात जमा केले आहे.
आतापर्यंत रिसोड, मालेगाव, मानोरा, वाशिम, मंगरुळपीर व कारंजा या तालुक्यात अध्र्यापर्यंतही वीजजोडणी पोहोचू शकली नाही. कारंजा तालुक्याला २३१ लाभार्थींचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत केवळ ९0 वीजजोडणीचे काम पूर्णत्वाकडे आल्याची माहिती आहे. नवीन ऑर्डर नसल्याने हा घोळ झाल्याचे सांगितले जात आहे. वीज वितरणने शेतकर्‍यांच्या भावनांशी जणू खेळ मांडला आहे.