शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासीबहुल खैरखेडा अजूनही मूलभूत सुविधांच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: September 30, 2015 01:28 IST

अंत्यसंस्कार उघड्यावर ; रस्ते, पाणी, आरोग्याच्या सुविधाच नाहीत.

यशवंत हिवराळे /राजुरा (जि. वाशिम ) : आदिवासीबहुल खैरखेडा गाव विकासापासून कोसोदूर असून, ग्रामस्थ अद्याप मूलभूत सुविधापासून वंचित आहेत. आदिवासीबहुल लोकवस्ती असलेल्या खैरखेडा गावात रस्ते, पाणी आणि आरोग्यासारख्या मूलभूत सुविधांचा आजही अभाव आहे. गत काही वर्षांचा अपवाद वगळता या गावात पावसाळय़ात तसेच उन्हाळय़ातही सुस्थितीत दुचाकी वाहने चालविण्यायोग्य रस्ता नाही. नदी, नाल्यातील ज्या डोहावर महिला धुणे धुतात, गुरेढोरे पाणी पितात, चक्क त्याच दूषित पाण्याचा वापर पिण्यासाठी करावा लागत आहे. बहुधा गावात एकही सार्वजनिक, खासगी विहीर अथवा कूपनलिका नाही. गावात एकही डॉक्टर नाही. हे गाव किन्हीराजा प्राथमिक आरोग्य केंद्राशी संलग्न असून, हे अंतर जवळपास ३0 कि.मी. आहे. काही डॉक्टर याचा फायदा घेत रुग्णांची लुबाडणूक करीत आहेत. आयुष्यभर मूलभूत सुविधा तरी मिळाव्या, यासाठी सतत संघर्ष करावा लागणार्‍या येथील ग्रामस्थांची मरणानंतरही यातनेतून सुटका होत नाही. येथील स्मशानभूमीत कोणत्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध नसल्यामुळे पार्थिवांवर अंतिम संस्कार करताना अनेक अडचणींचा सामना गावकर्‍यांना करावा लागतो. येथील स्मशानभूमीत शेडच उपलब्ध नाही. परिणामी ऊन, वारा आणि पावसात मृतांवर अंतिम संस्कार करावे लागत असल्याने मरणानंतरही समस्यांच्या जोखडातून ग्रामस्थांची सुटका होत नसल्याची विदारक अवस्था आहे. पावसाळा व हिवाळय़ाच्या दिवसांत मिळेल त्या ठिकाणी अंतिम संस्कार उघड्यावरच केल्याशिवाय गत्यंतर नाही. पावसाळ्यात तर पाउस उघडण्याची वाट पाहावी लागते. येथील व्यक्तीचे मरणही सुसहय़ नाही. स्मशानभूमीत टिन शेड उभारून जनतेची गैरसोय एकही लोकप्रतिनिधी दूर करू शकली नाही, ही खैरखेडा ग्रामस्थांची शोकांतिका ठरत आहे.