दुचाकीवर डबलसिट वाहनधारकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 16:17 IST2020-05-06T16:17:47+5:302020-05-06T16:17:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : कोरोनाच्या पृष्ठभूमिवर मोटारसायकलवर एक तर चारचाकी वाहनामधून चालक व दोन जण असा प्रवास करण्याच्या ...

दुचाकीवर डबलसिट वाहनधारकांवर कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोनाच्या पृष्ठभूमिवर मोटारसायकलवर एक तर चारचाकी वाहनामधून चालक व दोन जण असा प्रवास करण्याच्या शासनाच्या सूचना असताना चक्क पोलीसांसमोरुन दुचाकी व चारचाकी वाहनातून यापेक्षा जास्त नागरिक फिरताना दिसून येत आहेत. याबाबत पोलीस कर्मचारीचं अनभिज्ञ असून त्यांना वरिष्ठ स्तरावरुन गाईड लाईन देण्यात आली नसल्यासंदर्भात लोकमतने ६ मे रोजी वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत अशा वाहनांसह , वाहनावर नंबर नसणे, नियमांचे उल्लंघन करणाºया वाहनांवर कारवाई करण्यात आली. शहरातील पाटणी चौकामध्ये पोलीस कर्मचाºयांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºयांवर मोठया प्रमाणात कारवाई करण्यात आली. सकाळी ११ वाजेपर्यंत ५० च्यावर कारवाई करण्यात आली होती.