शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 11:28 IST

Accused of murder arrested : गायकवाड यांचा गळा दाबून खून केल्याची बाब निष्पन्न झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : तालुक्यातील अमानी येथील लक्ष्मण महादू गायकवाड (५२) यांचा पाण्यात बुडून आकस्मिक मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली होती. मात्र, तपासात गायकवाड यांचा गळा दाबून खून केल्याची बाब निष्पन्न झाली. त्यावरून पोलिसांनी घटनेची नोंद घेऊन दोन आरोपींना २ एप्रिल रोजी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण गायकवाड यांचा मृतदेह देवराव सावळे यांच्या शेतातील विहिरीत ३१ मार्च रोजी आढळला होता. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून प्रथमदर्शनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. दरम्यान, शवविच्छेदन अहवालात गायकवाड यांचा मृत्यू हा गळा दाबल्याने झाल्याचे निष्पन्न झाले. अधिक चाैकशी केली असता, ३० मार्च रोजी दुपारी २ ते ३ वाजताच्या सुमारास लक्ष्मण गायकवाड हे गावातीलच दादाराव अर्जुन खंडारे व सुनील रमेश इंगोले या दोघांसोबत मोटारसायकलवर बसून पार्टी करण्याकरिता देवराव सावळे यांच्या शेतात गेले होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली. सदर ठिकाणी पार्टी सुरू असताना, दादाराव खंडारे व सुनील इंगोले हे लक्ष्मण गायकवाड यांना शिवीगाळ करून मारहाण करीत होते, ही घटना पाहणारे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मिळून आले. त्यावरून पोलिसांनी दादाराव खंडारे व सुनील इंगोले यांचा शोध घेऊन दोघांनाही ताब्यात घेतले. आरोपींनीही गुन्ह्याची कबुली दिली आहे. फिर्यादी संदीप गायकवाड (रा.अमानी) यांनी दिलेल्या जबानी रिपोर्टवरून दोन्ही आरोपींवर १ एप्रिल रोजी मालेगाव पोलीस स्टेशनमध्ये भादंविचे कलम ३०२, ५०४, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सपोनि तडसे करित आहेत. पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनोने, सपोनि गजानन तडसे, पोहेकाँ कैलास कोकाटे, गणेश बियाणी, गजानन झगरे, समाधान वाघ यांनी सदर प्रकरण उघडकीस आणण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली.

टॅग्स :washimवाशिमCrime Newsगुन्हेगारी