शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
6
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
7
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
8
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
9
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
10
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
11
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
12
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
13
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
14
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
15
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
16
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
17
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
18
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
19
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
20
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात ९0 गावे-वाड्यांमध्ये टँकर!

By admin | Updated: October 27, 2014 00:01 IST

हिवाळ्यातच पाणीटंचाई : उपाययोजनेला प्राधान्य

वाशिम : पावसाळा संपत नाही; तोच पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. हिवाळ्याच्या सुरूवातीलाच राज्यभरातील ३७ गावे आणि ५३ वाडीवस्त्यांची तहान टँकरच्या पाण्याने भागविली जात आहे.साधारणत: हिवाळ्याच्या शेवटी पाणीटंचाई जाणवायला सुरूवात होते. उन्हाळ्याच्या प्रारंभी टँकरने पाणीपुरवठा केला जातो. २0१४ मध्ये मात्र ऑक्टोबरपासूनच टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. यावर्षी पावसाळा उशिराने सुरू झाला. जून महिन्यात १४0५ गावे आणि ३ हजार ४३६ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा झाला. जुलैमध्ये ही संख्या आणखी वाढली. जुलै १५५९ गावे आणि ३९७४ वाडयांमध्ये टँकर मधून पाणीवाटप झाले. ऑगस्टमध्येही १५५६ टँकर्स लागले आणि १३१३ गावे तसेच ३३७0 वाड्यांना पाणी पुरवावे लागले. सप्टेंबरमध्ये ९३ गावे, वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. ऑक्टोबरमध्येही सद्यस्थितीत ९0 गावे-वाड्यांना टँकर्सचे पाणी तहान भागवत आहे. पाण्याच्या घोटभर थेंबासाठी वनवन भटकणार्‍या राज्यातील ९0 गावांना टँकरचे पाणी मिळत आहे.भौगोलिक रचना, पाऊस, भूपृष्ठावरील जलसाठय़ाची स्थिती, पाणी वापराचे नियोजन आणि बाष्पीभवनाचे प्रमाण या घटकांवर पाणीटंचाईची स्थिती प्रामुख्याने अवलंबून असते. कोकणात पावसाळ्यातील सरासरी ९५ दिवसांमध्ये ३ हजार १६१ मि.मी., विदर्भात ५१ दिवसांमध्ये १ हजार १0६ मि.मी., तर पश्‍चिम महाराष्ट्रात ५१ दिवसांमध्ये १ हजार मि.मी. पाऊस होतो. हवामान खात्याने सत्तर वर्षांतील पाऊसमान आणि पर्जन्य दिवसाच्या अभ्यासातून हा निष्कर्ष काढला आहे. राज्यात वर्षांतील ५९ दिवसांमध्ये पाऊस होतो, पण आता विपरित हवामानाचा पावसाळ्यावर परिणाम होऊ लागला आहे. सद्यस्थितीत सर्वाधिक २२ टँकर्स मराठवाड्यातील २७ गावे-वाड्यांमध्ये लागले आहेत. पश्‍चिम महाराष्ट्रातील ४४ गावे-वाड्यांसाठी, तसेच पश्‍चिम विदर्भातील ३ गावांसाठी प्रत्येकी १0 टँकर्स आहेत. उत्तर महाराष्ट्रातील १६ गावे-वाड्यांमध्ये टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. कोकण आणि पूर्व विदर्भ मात्र तीव्र पाणीटंचाईमुक्त झाला आहे. सध्या या दोन्ही विभागात एकही टँकर सुरू नाही. कोकण आणि पूर्व विदर्भ ऑगस्टमध्येच टँकरमुक्त झाला होता.