शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

पहिल्या आठवड्यात ८४५४ विद्यार्थी हजर; सर्वजण ठणठणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2020 5:14 PM

पहिल्या आठवड्यात १३ हजार ९१४ पालकांचे संमतीपत्र मिळाले असून, यापैकी ८४५४  विद्यार्थी उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोनाच्या सावटाखाली २३ नोव्हेंबरपासून इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले. पहिल्या आठवड्यात १३ हजार ९१४ पालकांचे संमतीपत्र मिळाले असून, यापैकी ८४५४  विद्यार्थी उपस्थित होते. या सर्वांची प्रकृती ठणठणीत असल्याचे आरोग्य व शिक्षण विभागाने स्पष्ट केले.यंदा कोरोनामुळे मार्च महिन्यापासून शाळांमधील प्रत्यक्ष शिक्षण प्रभावित झाले. कोरोनाचा आलेख खाली येत असल्याचे पाहून २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले.  जिल्ह्यात नववी ते बारावीपर्यंत शिक्षण देणाऱ्या ३६३ शाळा असून, येथे ८२ हजार १५१ विद्यार्थी संख्या आहे. या शाळेत २५५१ शिक्षक आणि १६६८ शिक्षकेतर कर्मचारी आहेत. पहिल्या आठवड्यात १३ हजार ९१४ पालकांचे संमतीपत्र मिळाले असून, यापैकी ८४५४  विद्यार्थी उपस्थित होते. ४९ शिक्षकांचे कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आले असून, पहिल्या आठवड्यात २१४७ शिक्षकांनी प्रत्यक्ष शाळेत येऊन शिकविले तर काही शिक्षकांनी ‘वर्क फ्राॅम होम’नुसार कामकाज पाहिले. कोरोनाची धास्ती कायम असल्याने शाळेतील उपस्थित विद्यार्थी संख्या कमी आहे.

जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. व मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते यांच्या मार्गदर्शनात शाळा सुरू करण्याचे नियोजन केले. शाळा सुरळीत सुरू आहेत.  - रमेश तांगडे शिक्षणाधिकारी 

टॅग्स :washimवाशिमEducation Sectorशिक्षण क्षेत्रSchoolशाळाStudentविद्यार्थी