पहिल्या आठवड्यात ८४५४ विद्यार्थी हजर; सर्वजण ठणठणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 17:14 IST2020-12-04T17:14:19+5:302020-12-04T17:14:45+5:30
पहिल्या आठवड्यात १३ हजार ९१४ पालकांचे संमतीपत्र मिळाले असून, यापैकी ८४५४ विद्यार्थी उपस्थित होते.

पहिल्या आठवड्यात ८४५४ विद्यार्थी हजर; सर्वजण ठणठणीत
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोनाच्या सावटाखाली २३ नोव्हेंबरपासून इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले. पहिल्या आठवड्यात १३ हजार ९१४ पालकांचे संमतीपत्र मिळाले असून, यापैकी ८४५४ विद्यार्थी उपस्थित होते. या सर्वांची प्रकृती ठणठणीत असल्याचे आरोग्य व शिक्षण विभागाने स्पष्ट केले.
यंदा कोरोनामुळे मार्च महिन्यापासून शाळांमधील प्रत्यक्ष शिक्षण प्रभावित झाले. कोरोनाचा आलेख खाली येत असल्याचे पाहून २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले. जिल्ह्यात नववी ते बारावीपर्यंत शिक्षण देणाऱ्या ३६३ शाळा असून, येथे ८२ हजार १५१ विद्यार्थी संख्या आहे. या शाळेत २५५१ शिक्षक आणि १६६८ शिक्षकेतर कर्मचारी आहेत. पहिल्या आठवड्यात १३ हजार ९१४ पालकांचे संमतीपत्र मिळाले असून, यापैकी ८४५४ विद्यार्थी उपस्थित होते. ४९ शिक्षकांचे कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आले असून, पहिल्या आठवड्यात २१४७ शिक्षकांनी प्रत्यक्ष शाळेत येऊन शिकविले तर काही शिक्षकांनी ‘वर्क फ्राॅम होम’नुसार कामकाज पाहिले. कोरोनाची धास्ती कायम असल्याने शाळेतील उपस्थित विद्यार्थी संख्या कमी आहे.
जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. व मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते यांच्या मार्गदर्शनात शाळा सुरू करण्याचे नियोजन केले. शाळा सुरळीत सुरू आहेत.
- रमेश तांगडे
शिक्षणाधिकारी