शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतातील एकमेव व्यक्ती, ज्यांचा थेट देवाशी संपर्क", राहुल गांधींची PM मोदींवर बोचरी टीका
2
भारत नक्षलमुक्त देश कधी होणार? गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितली टाईमलाईन
3
“संजय राऊतांनी आपल्या पक्षाची, घराची काळजी करावी, देश अन् आमचा पक्ष...”: प्रविण दरेकर
4
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."
5
विराट कोहली RCB च्या पराभवामुळे स्ट्रेसमध्ये? BCCI ला केली खास विनंती अन् म्हणूनच तो...  
6
आश्चर्यकारक! मंत्र्याच्या बंगल्यातील कडुलिंबाच्या झाडाला लागले आंबे; सगळेच हैराण
7
MI ने दिले १५ कोटी, BCCI देते ५ कोटी, मुंबईत 8BHK फ्लॅट अन्...; हार्दिक पांड्याची एकूण संपत्ती किती?
8
शरद पवार गटातील हुकूमशाही, अहंभावाला कंटाळले, ६ जूननंतर महायुतीत इन्कमिंग; शिंदे गटाचा दावा
9
दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 
10
९९ रुपयांची स्कीम की मृत्यूचं निमंत्रण?; गेमिंग झोनच्या भयंकर आगीत ३५ जीव गेले
11
विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त स्मृतिस्थळावर पोहचले संपुर्ण देशमुख कुटुंब, वडिलांसाठी रितेशनं शेअर केली भावुक पोस्ट
12
Sachin Tendulkar : "बाबा, तुमची खूप आठवण येते, आजही तू जुनी खुर्ची...", 'क्रिकेटचा देव' भावूक!
13
नियमबाह्य काम करण्यासाठी मंत्र्याचा दबाव; निलंबित आरोग्य अधिकाऱ्याच्या पत्रानं खळबळ
14
हार्दिक पांड्याबरोबर घटस्फोटाच्या चर्चा अन् मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट झाली नताशा! कोण आहे तो?
15
नाशिकमध्ये सापडली २६ कोटींची रोकड अन् ९० कोटींची मालमत्ता; पैसे बाहेर काढण्यासाठी तोडलं फर्निचर
16
"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?
17
IPL 2024 Final Prize Money: जिंका किंवा हरा...! पैशांचा पाऊस निश्चित; जाणून घ्या बक्षिसांची रक्कम
18
"बुडणाऱ्या कंपनीचे शेअर्स कोणी विकत घेईल का?", नरेंद्र मोदींचा सपा आणि काँग्रेसवर हल्लाबोल 
19
"भ्रष्ट अधिकाऱ्यांचे लाड, प्रामाणिक अधिकाऱ्यांवर कारवाई? शिंदे सरकारच्या टेंडरबाज मंत्र्यांचा प्रताप"; वडेट्टीवारांचा आरोप
20
पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली, त्यामुळे...; शरद पवारांचं विधान

पीक नुकसानापोटी मिळाला ८१ लाखांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 1:29 PM

हा निधी १४ सप्टेंबर रोजी तालुकास्तरावर वितरीत करण्यात आला असून, बाधित शेतकऱ्यांना त्याचे वितरण लवकरच केले जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात डिसेंबर २०१९ आणि जानेवारी २०२० मध्ये मानोरा आणि वाशिम तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झालेल्या पीक नुकसानापोटी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी ८१ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. हा निधी १४ सप्टेंबर रोजी तालुकास्तरावर वितरीत करण्यात आला असून, बाधित शेतकऱ्यांना त्याचे वितरण लवकरच केले जाणार आहे.जिल्ह्यात डिसेंबर २०१९ आणि जानेवारी २०२० दरम्यान अवकाळी पाऊस आणि गारपिटीने रब्बी पिकांना मोठा फटका बसला. शासन निर्देशानुसार महसूल आणि कृषी विभागाने या पीक नुकसानाचे पंचनामे केले. त्यात मानोरा तालुक्यात तब्बल ५६७.२५ हेक्टर क्षेत्रावर, तर वाशिम तालुक्यात ३३.१० हेक्टर मिळून एकूण ६००.३५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे आर्थिक नुकसान पातळीपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे आढळून आले. त्यानुसार महसूल आणि कृषी विभागाने जिल्हास्तरावर अहवाल सादर केला. अहवालाच्या आधारे बाधित शेतकºयांना आर्थिक मदत देण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने विभागीयस्तरावर निधीची मागणी नोंदविली. या मागणीनुसार शासनाने बाधित शेतकºयांना आर्थिक मदत वितरीत करण्यासाठी ८१ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. त्यत मानोरा तालुक्यासाठी ७६ लाख ५३ हजार १५० रुपये, तर वाशिम तालुक्यातील बाधित शेतकºयांसाठी ४ लाख ४६ हजार ८५० रुपयांच्या निधीचा समावेश आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून १४ सप्टेंबर रोजी हा निधी वाशिम आणि मानोरा तहसीलकडे वर्ग करण्यात आला असून, बाधित शेतकºयांना लवकरच त्याचे वितरण केले जाणार आहे.सप्टेंबरमधील पीक नुकसानाचे पंचनामे युद्धपातळीवरजिल्ह्यात डिसेंबर २०१९ पासून अवकाळी, पाऊस, गारपिट आणि अतिवृष्टीचा फटका पिकांना बसून शेतकºयांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यात डिसेंबर २०१९ ते जानेवारी २०२० दरम्यान झालेल्या पीक नुकसानापोटी बाधित शेतकºयांना मदतीसाठी निधी उपलब्ध झाला आहे. त्यातनंतरच्या पीक नुकसानाचे पंचनामेही पूर्ण झाले असून, शासनस्तरावर बाधित शेतकºयांना मदतीसाठी निधीची मागणीही नोंदविण्यात आली आहे. आता सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या पीक नुकसानाचे पंचनामे युद्धपातळीवर करण्यात येत आहेत.

 

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरीagricultureशेती