मानोरा तालुक्यातील गारपिटग्रस्त ४४७ शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 06:45 PM2018-03-27T18:45:43+5:302018-03-27T18:45:43+5:30

मानोरा - तालुक्यातील पाळोदी सर्कलमध्ये १३फेब्रुवारी  रोजी झालेल्या गारपिटमुळे ५० टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या ४४७ शेतकºयांना ४२ लाख २९ हजार ७४० रुपयाची नुकसानभरपाई मिळणार अशी माहिती तहसीलदार डॉ.सुनिल चव्हाण यांनी दिली.

447 farmers of Maanora taluka have got compensation for damages | मानोरा तालुक्यातील गारपिटग्रस्त ४४७ शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मंजूर

मानोरा तालुक्यातील गारपिटग्रस्त ४४७ शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मंजूर

googlenewsNext
ठळक मुद्दे१३फेब्रुवारी रोजी पाळोदी सर्कलमध्ये गारपिट व अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान केले होते.चिन रोकडे यांनी पालकमंत्री संजय राठोड यांच्याशी संपर्क साधुन  पाळोदी सर्कलच्या व्यथा मांडल्या होत्या. शेतकºयांच्या खात्यात नुकसानभरपाईची रक्कम जमा करण्यात येणार आहे.

मानोरा - तालुक्यातील पाळोदी सर्कलमध्ये १३फेब्रुवारी  रोजी झालेल्या गारपिटमुळे ५० टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या ४४७ शेतकºयांना ४२ लाख २९ हजार ७४० रुपयाची नुकसानभरपाई मिळणार अशी माहिती तहसीलदार डॉ.सुनिल चव्हाण यांनी दिली. गारपिट ग्रस्तांना मदत मिळण्यासाठी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन उभारले होते.

१३फेब्रुवारी रोजी पाळोदी सर्कलमध्ये गारपिट व अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान केले होते.  नुकसानग्रस्त भागाचा महसुल  प्रशासनातर्फे उपविभागीय अधिकारी, डॉ.शरद जावळे, तहसीलदार डॉ.सुनिल चव्हाण यांनी तातडीने पाहणी करुन पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. परंतु महिना दिड महिना उलटुनसुध्दा शासकीय  मदत मिळत नसल्यामुळे आंदोलनाचे  हत्यार उपसले होते. माजी आमदार प्रकाश डहाके यांनी धरणे आंदोलन तर माजी जि.प.डॉ.सुभाष राठोड यांनी मोर्चाचे आयोजन केले होते. तत्पुर्वी राष्ट्रवादीचे  जि.प.सदस्य सचिन रोकडे व पं.स.सदस्य रेखा पडवाल यांनी गुराढोरांसह मोठया प्रमाणात आंदोलन उभारले होते.  आंदोलनादरम्यान सचिन रोकडे यांनी पालकमंत्री संजय राठोड यांच्याशी संपर्क साधुन  पाळोदी सर्कलच्या व्यथा मांडल्या होत्या. या जनआंदोलनाची दखल घेत प्रशासनाने ४२ लाख २९ हजार ७४० रुपयाची मदत जाहीर करुन कोरडवाहु शेतीला ६८००  रुपये हेक्टर,  ओलीत १४५००,  बागायती १८००० रुपये हेक्टरी मदत देण्यात आली. त्यामध्ये ३९७.४५ क्षेत्रात नुकसानग्रस्त ४४८ शेतकºयांना लाभ मिळणार आहे. त्यामध्ये शेंदुरजना  ४० शेतकरी, रुई  येथील १९६ शेतकरी, गोस्ता १२८ शेतकरी, ढोणी येथील ४ शेतकरी, पाळोदी ६ शेतकरी, रंजीतनगर १३ शेतकरी, हिवरा खुर्द ३३ शेतकरी, मेंद्रा ११ शेतकरी, इंगलवाडी १६ शेतकरी, वटफळ ११ शेतकरी अशा शेतकºयांच्या खात्यात नुकसानभरपाईची रक्कम जमा करण्यात येणार आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केलेल्या आंदोलनामुळे शासनाने तातडीने गारपिटग्रस्तांना नुकसान भरपाई देण्यात आली. हे जनतेच्या आंदोलनाचे यश आहे.ु पाळोदी सर्कलला भिषण पाणी टंचाईन ग्रासले असुन पाणी प्रश्न तातडीने सोडवा व रुई धरणाचे पाणी गावासाठी  सोडण्यात यावे. कायदा हाती घेवुन आम्ही धरणाचे पाणी गावकºयांना पिण्याकरिता सोडु.
- सचिन रोकडे जि.प. सदस्य,

- रेखा पडवाळ, पं.स.सदस्य

Web Title: 447 farmers of Maanora taluka have got compensation for damages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.