विनाअनुदानित शिक्षकांना ४० टक्के अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:37 AM2021-02-14T04:37:56+5:302021-02-14T04:37:56+5:30

प्रचलित नियमानुसार १०० टक्के अनुदान मिळाले पाहिजे, अघोषित शाळा निधीसह घोषित करा, सेवा संरक्षण द्यावे या मागण्यांसाठी आझाद मैदान ...

40% subsidy for unsubsidized teachers | विनाअनुदानित शिक्षकांना ४० टक्के अनुदान

विनाअनुदानित शिक्षकांना ४० टक्के अनुदान

Next

प्रचलित नियमानुसार १०० टक्के अनुदान मिळाले पाहिजे, अघोषित शाळा निधीसह घोषित करा, सेवा संरक्षण द्यावे या मागण्यांसाठी आझाद मैदान मुंबई येथे २९ जानेवारीपासून शिक्षक समन्वय संघाच्या वतीने धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या दबावामुळे टप्पा वाढीचा निर्णय झाला, असा दावा आंदाेलकांकडून केला जात आहे. तथापि, आमच्या मागण्या पूर्ण मंजूर झाल्या नाहीत. त्यामुळे आंदोलन मागे घेतले जाणार नाही. असा निर्णय शिक्षक समन्वय संघाने घेतला आहे.

...............

१३ सप्टेंबर २०१९ च्या शासन निर्णयानुसार १२८ माध्यमिक शाळांमधील ६४२ शिक्षक व ४१४ शिक्षकेतर पदे आणि प्रपत्र ब नुसार २६८ माध्यमिक शाळांमधील ७९८ वर्ग तुकड्यांवरील १,१०४ शिक्षक पदे, असे एकूण १,७४६ शिक्षक व ४११ शिक्षकेतर पदांना १ एप्रिल २०१९ पासून २० टक्के अनुदान मंजूर करण्यात आले होते. आता या शिक्षक, कर्मचाऱ्यांना ४० टक्के अनुदान मिळणार आहे.

Web Title: 40% subsidy for unsubsidized teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.