शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
4
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
5
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
6
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
7
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
8
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
9
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
10
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
11
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
12
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
13
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
14
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
15
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
16
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
17
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
18
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
19
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
20
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील ३७ गावे बाधित

By admin | Updated: January 3, 2015 01:23 IST

गारपीटग्रस्त शेतकरी धडकले तहसील कार्यालयावर.

वाशिम : गारपीट व अवकाळी पावसामुळे जिल्हय़ात झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यात आला. यामध्ये ३७ गावे बाधित आढळून आली. नुकसानीचे पंचनामे तातडीने करुन त्यासोबतच अहवाल सादर करण्याची सूचना पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी संबंधित यंत्रणेला केली. यासंदर्भात पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी रामचंद्र कुलकर्णी यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली व गारपीट, अवकाळी पावसामुळे जिल्हय़ात झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. जिल्हय़ातील तीन तालुक्यातील ३७ गावांना गारपीट व अवकाळी पावसाचा फटका बसला असून, अंदाजे ५ हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. मालेगाव तालुक्यातील सर्वाधिक २५ गावांना या गारपीट व अवकाळी पावसाचा फटका बसला असून, कारंजा तालुक्यातील १0 व मंगरुळपीर तालुक्यातील दोन गावांमध्ये काही प्रमाणात नुकसान झाले असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.जिल्हाधिकारी कुलकर्णी यांनी मालेगाव तालुक्यातील माळेगाव नकी येथील नुकसानीची पाहणी करत असताना पालकमंत्र्यांना दूरध्वनीवरुन नुकसानीची माहिती दिली, यावेळी पालकमंत्र्यांनी तेथील शेतकर्‍यांसोबतही दूरध्वनीवरुन संपर्क साधला व नुकसानीची माहिती घेतली. तसेच शासनाकडून तातडीने मदत मिळवून देण्याचे आश्‍वासन देत शेतकर्‍यांना धीर दिला.मंगरूळपीर तालुक्यामध्ये पूर, वनोजा परिसरात ३१ डिसेंबर रोजी रात्री झालेल्या गारपिटीमुळे जवळपास २५ हेक्टर फळबागांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज असल्याची माहिती तहसीलदार बळवंत अरखराव यांनी दिली. वाशिम, रिसोड व मानोरा परिसरात गारपीट झाली असून, तुरळक पाऊस पडला. कारंजा तालुक्याचा पोहा परिसरातील पोहा, शिवनगर, बेलमंडळ, पारवा कोहर, काजळेश्‍वर, उकर्डा, महागाव लोहगाव, मोर्‍हळ, वढवी, किसाननगर, लोहारा, चिंचखेड, चांदई, वालई, तुळजापूर आदी गावातील शेतकर्‍यांच्या रब्बी पिकांसह फळबागांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. यामध्ये गहू, हरभरा, तूर, पपई, कपाशी, पपई, संत्रा, निंबू, कांदा, डाळींब पिकांची लागवड केली होती.