शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

टोयोटो कारमधून ३६ लाखांची रोकड जप्त; निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकाची कारवाई

By सुनील काकडे | Updated: March 30, 2024 19:24 IST

त्यातील १६ लाखांच्या रकमेचा परवाना आहे; तर २० लाखांची रक्कम संशयास्पद असल्याचे चाैकशीदरम्यान निष्पन्न झाले.

सुनील काकडेवाशिम : कारंजा ते अमरावती रस्त्यावरील धनज बु. येथे कार्यान्वित करण्यात आलेल्या स्थिर सर्वेक्षण पथकाने अमरावतीकडून येणाऱ्या एका कारमधून ३६ लाख १३ हजारांची रोकड जप्त केली. ही कारवाई ३० मार्च रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास करण्यात आली. त्यातील १६ लाखांच्या रकमेचा परवाना आहे; तर २० लाखांची रक्कम संशयास्पद असल्याचे चाैकशीदरम्यान निष्पन्न झाले.

प्राप्त माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमिवर ठिकठिकाणी स्थिर सर्वेक्षण पथक नियुक्त करण्यात आले आहेत. धनज बु. येथील पथकामध्ये समाविष्ट पुरूषोत्तम ठाकरे, ब्रह्मानंद राऊत, गजेंद्र पाखरे, अजय ढोके, सुनील मेहरे यांच्याकडून ३० मार्च रोजी ये-जा करणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू होती. यादरम्यान अमरावतीवरून येणाऱ्या एम.एच. २७ बी.एक्स. १०५६ क्रमांकाच्या टोयोटा कारची तपासणी केली असता, पवन डोंगरे व मंगेश भागवतकर यांच्याकडे ३६ लाख १३ हजार रुपयांची रक्कम असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले.

चालक नरेंद्र ढोले याच्यासह अन्य दोघांकडे विचारणा केली असता, एटीएम व बँकेत भरणा करण्याकामी रक्कम घेऊन जात असल्याचे आणि निवडणूक आयोगाची परवानगी, क्यू-आर कोड असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, क्यू-आर कोडला स्कॅन केले असता १६ लाख रुपये वाहतूक करण्याची परवानगी असल्याचे आढळून आले. उर्वरित २० लाख रुपये वाहतूक करण्याची परवानगी नसल्याने ही रक्कम संशयास्पद असल्याचे निष्पन्न झाले.स्थिर सर्वेक्षण पथकाने घटनेची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी कैलास देवरे व सहायक खर्च निरीक्षक युसूफ शेख यांना फोनद्वारे कळविली. संबंधितांनी संपूर्ण रक्कम जप्त करण्याचे फर्मान सोडले.

आयकर विभागाकडे प्रकरण सुपूर्द

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक आचार संहिता कालावधीत १० लाखांपेक्षा अधिक रक्कम अवैधरित्या वाहतूक करत असल्याचे आढळल्यास त्याचा तपास आयकर विभागाला करावा लागतो. त्याअनुषंगाने पुढील तपासकामी हे प्रकरण आयकर विभागाकडे सुपूर्द करण्यात आले, अशी माहिती सहायक निवडणूकनिर्णय अधिकारी कैलास देवरे यांनी दिली.

टॅग्स :washimवाशिमCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस