वाशिम जिल्ह्यात २.४० लाख फळझाडांची होणार लागवड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 14:57 IST2019-07-24T14:57:32+5:302019-07-24T14:57:39+5:30
प्रती तालुका ४० हजार याप्रमाणे २.४० लाख फळझाडांची लागवड करण्याचा निर्धार कृषी विभागाने केला आहे.

वाशिम जिल्ह्यात २.४० लाख फळझाडांची होणार लागवड!
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात १ जुलै २०१९ पासून ३३ कोटी वृक्षलागवड मोहिमेस सुरूवात झाली आहे. ३० सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या या मोहिमेत कृषी विभागानेही सक्रीय सहभाग नोंदविला असून प्रती तालुका ४० हजार याप्रमाणे २.४० लाख फळझाडांची लागवड करण्याचा निर्धार या विभागाने केला आहे.
शासनाच्या निर्देशावरून जिल्ह्यात १ जुलैपासून ३३ कोटी वृक्षलागवड मोहिमेस सुरूवात झाली आहे. ही मोहिम ३० सप्टेंबरपर्यंत चालणार असून याअंतर्गत वनविभाग, सामाजिक वनिकरण विभागासह कृषी विभाग व प्रशासकीय यंत्रणेतील अन्य विभागांना ठरविक उद्दीष्ट विभागून देण्यात आलेले आहे. समाधानकारक पावसाअभावी वृक्षलागवड मोहिमेस काहीअंशी ‘ब्रेक’ लागला असला तरी पाऊस झाल्यास विनाविलंब वृक्षांची लागवड व्हावी, यासाठी प्रशासन प्रयत्नशिल आहे. दरम्यान, स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसह कृषी विभागाकडून फळझाडांचे प्रमाण वाढविण्याकरिता राबविण्यात येणाºया विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासोबतच प्रती तालुका ४० हजार याप्रमाणे जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये २.४० लाख फळझाडांची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जात आहे. कृषी विभागाने घेतलेल्या या पुढाकाराचे सर्वच स्तरातून कौतूक होत आहे.
शासनस्तरावरून राबविण्यात येणाºया फळबाग योजनेसोबतच ३३ कोटी वृक्षलागवड मोहिमेच्या यशस्वीतेसाठी सर्वंकष प्रयत्न केले जात आहे. त्यातूनच वाशिम तालुक्यासह अन्य तालुक्यांमध्येही २.४० लाख फळझाडे लावण्याचे उद्दीष्ट बाळगण्यात आले आहे.
- अभिजित देवगिरीकर
तालुका कृषी
अधिकारी, वाशिम