शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
2
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
3
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
4
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
5
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
6
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
7
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
8
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
9
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
10
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
11
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
12
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
13
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
14
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
15
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
16
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
17
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
18
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
19
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
20
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
Daily Top 2Weekly Top 5

रोपवाटिकेसाठी शेतकऱ्यांना मिळणार २.३० लाख अनुदान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 13:09 IST

पात्र शेतकºयांना प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के किंवा २.३० लाख रुपये अनुदान मिळणार आहे.

वाशिम : राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत राज्यात आॅक्टोबर महिन्यापासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना राबविण्यात येणार असून, याअंतर्गत पात्र शेतकºयांना प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के किंवा २.३० लाख रुपये अनुदान मिळणार आहे. यासाठी जिल्ह्यातील शेतकºयांनी १९ आॅक्टोबरपर्यंत ‘महाडीबीटी’ संकेतस्थळावर किंवा तालुका कृषी अधिकाºयांकडे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी ३० सप्टेंबर रोजी केले.भाजीपाला पिकांची दर्जेदार व कीडमुक्त रोपे निर्मिती उत्पादनात वाढ करणे, शेतकºयांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे, शेतकºयांचे जीवनमान उंचाविण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना राबविली जाणार आहे. या योजनेमध्ये प्रामुख्याने कृषि पदवी किंवा पदविकाधारक, महिला बचत गटास प्राधान्य देण्यात येणार आहे. योजनेचा कालावधी २ वर्षाचा आहे. योजनेची अंमलबजावणी तालुकास्तरावरून करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत वाशिम जिल्ह्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी ७ व अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता ३ असे करून १० रोपवाटिका निर्मितीचा लक्ष्यांक असून याअंतर्गत प्रत्येक तालुक्यात किमान १ रोपवाटिका निर्मिती होईल, यादृष्टीने नियोजित आहे. यानुसार सर्वसाधारण प्रवर्गासाठी वाशिम तालुक्यात २ तर उर्वरित पाच तालुक्यांमध्ये प्रत्येकी १ रोपवाटिका निर्मिती तसेच अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता मंगरूळपीर, कारंजा व मानोरा तालुक्यात प्रत्येकी १ रोपवाटिका निर्मितीचा लक्ष्यांक नियोजित आहे. इच्छूक शेतकºयांनी २ आॅक्टोबर ते १९ आॅक्टोबर २०२० दरम्यान प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन तोटावार यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरीgovernment schemeसरकारी योजना