शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
2
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
3
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
4
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
5
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
6
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
7
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
8
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
9
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
10
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
11
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
12
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
13
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
14
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
18
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
19
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
20
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
Daily Top 2Weekly Top 5

२. ५३ कोटी रुपये शिलकीचा अर्थसंकल्प सादर

By admin | Updated: March 19, 2015 01:40 IST

वाशिम जिल्हा परिषद; ग्रामीण भागासाठी भरीव तरतूद.

वाशिम : जिल्हा परिषदेच्या १८ मार्चला झालेल्या सर्वसाधारण सभेत जि. प. उपाध्यक्ष तथा अर्थ समितीचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी दोन कोटी ५३ लाख ९३ हजार ८१४ रुपयांचा शिलकीचा अर्थसंकल्प सादर केला आणि तो सभागृहात एकमताने मंजूरही झाला. जिल्हा परिषद अध्यक्ष सोनाली जोगदंड, शिक्षण सभापती चक्रधर गोटे, महिला व बालकल्याण सभापती ज्योती गणेशपुरे, कृषी व पशु संवर्धन सभापती हेमेन्द्र ठाकरे, समाजकल्याण सभापती पानुबाई जाधव, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी डी. ए. वानखेडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी डी. के. हिवाळे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. सभेच्या सुरुवातीला जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी, उपस्थित आजी व माजी जिल्हा परिषद सदस्य आणि विभाग प्रमुख यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी सविस्तर अर्थसंकल्प सादर केला. आतापर्यंतच्या इतिहासात प्रथमच ५ कोटी रुपये व्याजापोटी जिल्हा परिषदेला मिळाले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जि. प. शाळेच्या इमारत दुरुस्तीसाठी २0 लाख रुपये, समाजकल्याण अंतर्गत योजनांसाठी १ कोटी ५६ लाख, दुर्धर आजारासाठी १0 लाख रुपये, महिला व बाल कल्याण विभागासाठी (चालु व पुढील वर्षाचे मिळुन) १ कोटी १0 लाख रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पात केली असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. त्याचप्रमाणे आदिवासी व अपंगांना सायकली वाटप, गुरांचे प्रदर्शन, साप व श्‍वानदंश लसीकरिता, पाणी शुध्दीकरणाकरिता या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली. विभागीय स्पर्धांकरिता १२ लाख तरतूद केली. दरवर्षी प्रत्येक जिल्हा परिषदेच्यावतीने अधिकारी व कर्मचार्‍यांच्या जिल्हा व विभागस्तरीय स्पर्धा होतात. याचा खर्च त्या-त्या कर्मचार्‍यांच्या पगारातून केल्या जात होता. पुढील (सन २0१५-१६) मध्ये वाशिम येथे होणार्‍या विभागीय क्रीडा स्पर्धेच्या खर्चासाठी १२ लाख एवढी तरतूद करण्यात आली आहे. याबाबतचा ठराव खुद्द चंद्रकांत ठाकरे यांनीच मांडला होता. त्याला उपस्थित सदस्यांनी एकमतांनी मंजुरी दिली.