वाशिम जिल्ह्यात ५९ नवीन अंगणवाड्या साकारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 03:56 PM2019-08-02T15:56:55+5:302019-08-02T15:56:59+5:30

वाशिम : जिल्ह्यात १०७६ अंगणवाड्या असून, आणखी ५९ अंगणवाडी केंद्रांना जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी  अधिकारी दीपक कुमार मीना यांनी प्रशासकीय मंजूरी दिली आहे.

19 new anganwadi will be opened in Washim district | वाशिम जिल्ह्यात ५९ नवीन अंगणवाड्या साकारणार

वाशिम जिल्ह्यात ५९ नवीन अंगणवाड्या साकारणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क    
वाशिम : जिल्ह्यात १०७६ अंगणवाड्या असून, आणखी ५९ अंगणवाडी केंद्रांना जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी  अधिकारी दीपक कुमार मीना यांनी प्रशासकीय मंजूरी दिली आहे. जिल्हा नियोजन विभागाकडून निधी प्राप्त होताच, या अंगणवाडी केंद्रांचे बांधकाम सुरू करण्याच्या सूचनाही संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या.
बालकांना पूर्वप्राथमिक शिक्षणाचे धडे देण्याबरोबरच महिला व बालकल्याण विभागाच्या योजनांची अंमलबजावणी अंगणवाडी केंद्रांच्या माध्यमातून केली जाते. लोकसंख्येच्या निकषानुसार आणखी काही अंगणवाडी केंद्रांची गरज असल्याचा मुद्दा ऐरणीवर आला होता. त्याअनुषंगाने नवीन अंगणवाडी केंद्रांचा प्रस्ताव तयार करण्यात आला. सन २०१८-१९ या वर्षात २० आणि सन २०१९-२० या वर्षात ३९ अशा एकूण ५९ अंगणवाडी केंद्रांना मुख्य कार्यकारी अधिकारी मीना यांनी प्रशासकीय मंजूरी दिली आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून नवीन अंगणवाडी केंद्रांना, शासनाच्या श्वेतपत्रिकेमध्ये मंजूर करण्यात आलेल्या रकमेच्या दीडपट मर्यादेमध्ये प्रशासकीय मंजूरीदेखील प्रदान करण्यात आली आहे.
सन २०१८-१९ या वर्षात मारसूळ, खंडाळा शिंदे, करंजी क्र. २, अंचळ, पार्डी तिखे, घोटा, चिंचाबा भर क्र.१, मूर्तिजापूर, पेडगाव क्र. ४, माळशेलु क्र.२, लखमापूर, म्हसणी क्र. २, दापुरा बु. क्र.२, गोस्ता क्र.२, खेर्डा खु. मिनी, तोरनाळा क्र.२, जांभरून भी., काटा क्र.३, वाघोली खु., कन्हेरी अशा २० नवीन अंगणवाडी केंद्रांना जिल्हा वार्षिक योजनेतून प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. प्रत्येक अंगणवाडी केंद्राच्या बांधकामासाठी ८.५० लाख रुपये निधी कामासदेखील प्रशासकीय मंजूरी मिळाली आहे.
तसेच सन २०१९-२० या वर्षात जिल्हा वार्षिक योजनेतून ३९ नवीन अंगणवाडी केंद्रांना, शासनाच्या श्वेतपत्रिकेमध्ये मंजूर करण्यात आलेल्या २.२५ कोटी तरतुदीच्या दीडपट मर्यादेमध्ये प्रशासकीय मंजूरी प्रदान करण्यात आली आहे. यामध्ये पिंपळा, सोनाळा क्र.१, आमखेडा मिनी, मोप क्र.२, शेलु खडसे, मोहजा बंदी, भर जहॉगीर क्र.४, लोणी बु. क्र.१, कोयाळी बु., पिंपरखेडा, वाडी वाकद, कंकरवाडी क्र.२, येवती क्र.१, जवळा, कुºहा, वाकद क्र ६, वडजी, शेलगाव राजगुरे, नावली क्र १, येवती क्र २, कुकसा, कळमगव्हाण, नंधाना क्र १, वरूड तोफा, किनखेडा, हिवरापेन, मुंगसाजी नगर, सवड क्र.३, आसोला खु. क्र.१, दापुरा खुर्द, जगदंबानगर, जनुना, उज्वलनगर, वटफळ क्र.२, फुलउमरी क्र.१, पूर, केकतउमरा, किनखेडा ता. वाशिम, कामठवाडा अशा ३९ अंंगणवाडी केंद्रांचा समावेश आहे.
 

Web Title: 19 new anganwadi will be opened in Washim district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम