पारवा मोहगव्हाण : येथून जवळच असलेल्या बोरव्हा येथील शेतकरी मोतीराम चव्हाण यांनी त्यांची १५ गुरे अज्ञात चोरट्यांनी ९ जून रोजी चोरून नेल्याची फिर्याद मानोरा पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}सदर निवेदनानुसार,चव्हाण हे बोरव्हा खुर्द येथील रहिवासी असून शेतीचा व्यवसाय करतात.त्यांच्या मालकीची १५ जनावरे ९ जून रोजी शेतातून अज्ञात इसमांनी चोरून नेली असल्याचा आरोप निवेदनामधून केला आहे. सदर निवेदनामध्ये जनावरांची सरासरी किंमत २ लाख असल्याचे नमूद केले आहे.ते ९ जून रोजी १0.३0 ला जेवणासाठी घरी आले असता सदर चोरी करण्यात आली. याप्रमाणेच बोरव्हा येथील रेऊलाल रामसिंग चव्हाण या शेतकर्यानेदेखील त्याची काही जनावरे चोरुन नेल्याची फिर्यांद ११ जून रोजी पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे.