वाशिम जिल्ह्यातील तीन मतदारसंघात १३८ नामांकन दाखल

By Admin | Updated: September 27, 2014 23:58 IST2014-09-27T23:58:56+5:302014-09-27T23:58:56+5:30

कारंजा मतदारसंघात ४५, वाशिम मतदारसंघात ४६ तर रिसोड मतदारसंघात ४७ नामांकन दाखल.

138 nominations filed in three constituencies of Washim district | वाशिम जिल्ह्यातील तीन मतदारसंघात १३८ नामांकन दाखल

वाशिम जिल्ह्यातील तीन मतदारसंघात १३८ नामांकन दाखल

वाशिम : आगामी १५ ऑक्टोंबरला होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकीसाठी २८ सप्टेंबरला नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तिनही विधानसभा मतदार संघात एकूण १३८ नामांकन दाखल करण्यात आले. जिल्ह्यातील कारंजा मतदार संघात ४५ नामांकन दाखल केले. वाशिम विधानसभा मतदार संघ ४६ नामांकन तर रिसोड मतदार संघात एकूण ४७ नामांकन असे एकूण १३८ नामांकन दाखल करण्यात आले.
१५ ऑक्टोंबरला विधानसभेची निवडणूक होऊ घातली आहे. सदर निवडणूकीची अधिसुचना २0 सप्टेंबरला जारी झाली असुन तेव्हापासूनच नामांकन दाखल करण्याला प्रारंभ झाला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी तिन्ही मतदारसंघातून १0६ उमेदवार अर्जांचे वितरण झाले असुन यापैकी केवळ दोन नामांकन दाखल झाले होते.

Web Title: 138 nominations filed in three constituencies of Washim district