शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

शौच्छालयासाठी मिळणार १२ हजाराचे अनुदान

By admin | Updated: November 12, 2014 23:19 IST

स्वच्छ भारत मिशन : शौच्छालय बांधण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन.

वाशिम : केंद्र व राज्य स्तरावर राबविण्यात येत असलेल्या निर्मल भारत अभियानाचे २ ऑक्टोंबर २0१४ पासुन स्वच्छ भारत मिशन असे नामाकरण करण्यात आले असून गावातील कुटुंबांनी शौचालय बांधुन त्याचा नियमित वापर केल्यास त्यांना १२ हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. सायखेडा येथील संगिता आव्हाळे यांनी मंगळसुत्र विकुन घरी शौचालय बांधल्यानंतर राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी संगिता यांना मंगळसुत्र देऊन गौरव केला होता. तेंव्हा शौचालयाचे प्रोत्साहन अनुदानाचा मुद्दा ऐरणीवर आला होता. त्यानुसार ७ नोव्हेंबरला शासनाने एका परिपत्रकाद्वारे प्रोत्साहन अनुदानाची रक्कम १२ हजार रूपये केले असल्याचे सर्व जिल्हा परिषदांना कळविले आहे. मंगरुळपीर तालुक्यातील सायखेडा गावा तील संगिता आव्हाळे या महिलेने शौचालयासाठी आपले मंगळसुत्र व इतर सोन्याचे दागिने विकले. जिल्हा परिषदेने या घटनेला सर्व वर्तमानपत्रात प्रसिद्धी दिली. ही स्टोरी टी. व्ही. चॅनलने लावुन धरल्यानंतर केंद्र व राज्य शासनाने याची दखल घेतली. यानिमित्ताने मग शौचालय अनुदान वाढविण्याचा मुद्दा पुढे आला. नंतर शासनाने एक परिपत्रक काढुन शौचालय बांधुन वापर करणार्‍या कुटुंबांना १२ हजार रुपये देण्यात येणार असल्याचे जाहिर केले आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा .सोनाली जोगदंड यांनी स्वच्छ भारत मिशन या महत्वाकांक्षी कार्यक्रमाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू असल्याचे स्पष्ट करून जिल्हावासीयांनी या अभियानाला उत्स्फरुत प्रतिसाद दिला असल्याचे सांगीतले. शौच्छालयाच्या वाढलेल्या अनुदानामुळे शौच्छालयांचे बांधकाम करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन मिळणार असल्याचे त्यांने स्पष्ट केले.