शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
12
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
13
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
14
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
15
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
16
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
17
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
18
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
19
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

तीन महिन्यांत आढळले १० हजार कोरोनाबाधित रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 11:24 IST

Corona Cases in Washim : ३ एप्रिलअखेर बाधितांचा एकूण आकडा १६ हजार ६९९ वर पोहोचला आहे.  

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचे संकट दिवसागणिक वाढतच चालले आहे. दैनंदिन आढळणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३०० पेक्षा अधिक असून, नव्या वर्षांतील तीन महिन्यात १० हजार २७ रुग्ण आढळले असून, ३ एप्रिलअखेर बाधितांचा एकूण आकडा १६ हजार ६९९ वर पोहोचला आहे.  जिल्ह्यात १ जानेवारी २०२० रोजी कोरोना बाधित रुग्णांचा एकूण आकडा ६ हजार ६७२ होता. १ फेब्रुवारी रोजी तो ४८२ ने वाढून ७ हजार १५४ झाला; मात्र १ मार्च रोजी हा आकडा तब्बल १ हजार ९१६ ने वाढून ९ हजार ७० झाला; तर १ मार्च ते १ एप्रिल या कालावधीत ७  हजार ३२८ ने वाढून १६ हजार ३९८ झाला, तसेच २ व ३ एप्रिल या दोन दिवसांत ६२४ कोरोना बाधित रुग्ण आढळले असून, ३ एप्रिलअखेर बाधितांचा एकूण आकडा १६ हजार ६९९ वर पोहोचला आहे. बाधितांचा दैनंदिन आकडा ३०० पेक्षा अधिकच असून, त्यात घट होणे अशक्य झाल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. या संकटावर नियंत्रण मिळविण्याकरिता सर्वंकष प्रयत्न केले जात आहेत. जिल्हाभरात कलम १४४ लागू असून, सर्व प्रकारची दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ८ या वेळेत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. रात्री ८ ते सकाळी ६ या वेळेत जमावबंदी लागू आहे. दुसरीकडे चौथ्या टप्प्यात ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांच्या कोरोना लसीकरणालादेखील सुरुवात करण्यात आल्याने कोरोना संकटाचे प्रमाण कमी होईल, अशी अपेक्षा नागरिक बाळगून आहेत.

४६८ रुग्ण संस्थात्मक; तर २१९० रुग्ण गृह विलगीकरणातजिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली आहे. त्यानुषंगाने प्रशासनाने काही खासगी रुग्णालयेही अधिग्रहीत केली आहेत. दरम्यान, ३ एप्रिलअखेर संस्थात्मक विलगीकरणात ४६८; तर गृह विलगीकरणात २१९० रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या