शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

सेंद्रीय कर्ब निर्मितीसाठी  १०० ‘ऑर्गनिक युनिट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 12:34 IST

Organic Curb Production सेंद्रीय कर्ब वाढविण्यासाठी कृषी विभागाने जिल्ह्यात १०० ऑर्गनिक युनिट अर्थात लघु प्रयोगशाळा निर्मितीची तयारी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा अमर्याद वापर झाल्याने शेतजमिनीमधील सेंद्रीय कर्ब जवळपास नष्ट झाल्याने उत्पादन क्षमता घटली आहे. ही बाब लक्षात घेत शेतजमिनीतील सेंद्रीय कर्ब वाढविण्यासाठी कृषी विभागाने जिल्ह्यात १०० ऑर्गनिक युनिट अर्थात लघु प्रयोगशाळा निर्मितीची तयारी केली आहे. शेतकरी गटांना हे ऑर्गनिक युनिट दिले जाणार आहेत. शेतजमितीन सेंद्रीय कर्ब वाढविण्यासाठी राबविला जाणारा राज्यातील हा पहिलाच प्रयोग आणि उपक्रम ठरणार आहे.जमिनीच्या सुपिकतेसाठी सेंद्रीय कर्ब अत्यंत महत्त्वाचे आहे. साधारण १२ ते १८ टक्के सेंद्रीय कर्ब असलेली शेतजमीन सुपिक मानली जाते. सेंद्रीय कर्बामुळे जमिनीतील सूक्ष्मजीव कार्यरत होऊन माती जिवंत राहण्यास मदत होते. जमिनीमध्ये कार्बन आणि नत्र यांचे योग्य गुणोत्तर ठेवले जाते.  तथापि, जिल्ह्यात गत काही वर्षांत शेतकऱ्यांकडून रासायनिक खतांसह रासायनिक कीटकनाशकाचा वारेमाप वापर होत आहे. त्यामुळे जमिनीतील मूळ सेंद्रीय कर्बांचे प्रमाण अत्यंत कमी झाले असून, शेती उत्पादनावर त्याचा मोठा परिणाम होत आहे. ही प्रक्रिया पुढे, अशीच कायम राहिल्यास जिल्ह्यातील शेती नापिक होण्याची भीती आहे. ही बाब लक्षात घेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी शेतजमिनीतील कर्बाचे प्रमाण वाढविण्यासाठी जिल्ह्यात १०० ऑर्गनिक युनिट स्थापन करण्याची योजना आखली आहे. जिल्ह्यातील १०० शेतकरी गटांना हे ऑर्गनिक युनिट दिले जाणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव तयार करण्यात आला असून, तो मंजुरीसाठी नीती आयोगाकडे पाठविला जाणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी दिली.   

रासायनिक खताच्या वापरामुळे जिल्ह्यातील शेतजमिनीची सुपिकता घटली आहे. त्यामुळे सेंद्रीय कर्ब वाढविण्यावर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. त्यासाठी ऑर्गनिक युनिट अर्थात सेंद्रीय कर्ब निर्मितीसाठी लघु प्रयोगशाळा उभारण्याची तयारी आहे. जिल्ह्यातील शंभर शेतकरी गटांना या प्रयोगशाळा दिल्या जातील. त्याबाबतचा प्रस्ताव तयार झाला असून, तो जिल्हाधिकाऱ्यांमार्फत नीती आयोगाकडे मंजुरीसाठी पाठविला जाईल.-शंकर तोटावार,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :washimवाशिमAgriculture Sectorशेती क्षेत्र