१ लाख ८४ हजारांचे गौण खनिज जप्त

By Admin | Updated: September 30, 2015 01:30 IST2015-09-30T01:30:19+5:302015-09-30T01:30:19+5:30

शिरपूर जैन येथे तहसीलदाराची कारवाई.

1 lakh 84 thousand mineral minerals seized | १ लाख ८४ हजारांचे गौण खनिज जप्त

१ लाख ८४ हजारांचे गौण खनिज जप्त

शिरपूर जैन (जि. वाशिम ): अवैध रेती व गिट्टीची वाहतूक करणारे तीन ट्रक मालेगावच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी शिरपूर व करंजी अमानी रस्त्यावर २९ सप्टेंबर रोजी जप्त केले. सतत होणार्‍या गौण खनिजाची चोरी रोखण्यासाठी मालेगावच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी मोहीम उघडली आहे. २९ सप्टेंबर रोजी शिरपूर पोलीस ठाण्याजवळ सहा ब्रास रेतीची वाहतूक करणारे ट्रक (एम.एच. ४४-३७७७), साडेतीन ब्रास रेती असलेला ट्रक (एम.एच. ३७ जे. १0८७) हे दोन ट्रक एकूण १ लाख ५७ हजार रुपयांची अवैध रेती वाहतूक करताना पकडले. याशिवाय करंजी अमानी रस्त्यावर अवैधरीत्या २७ हजार किमतीच्या स्टोन डस्टची वाहतूक करणारा (क्रमांक एम.एच. ३७ जे. १२९२) जप्त करण्यात आला. तिन्ही ट्रकचे चालक, वाहक हे वाहन रस्त्यावर सोडून पसार झाले. ही कारवाई करतेवेळी मंडळ अधिकारी दिनकर केंद्रे, एम.डब्ल्यू. खुळे तलाठी जे.एन. साठे, एन.व्ही. अंबुलकर, चालक बी.एस. घुगे, डी.एस. ताकतोडे, दिलीप कांबळे, तुकाराम मोरे, हरिष हनवते हे तहसीलदार मेटकरी यांच्यासमवेत होते.

Web Title: 1 lakh 84 thousand mineral minerals seized