शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

पेसा योजनेंतर्गत गावांना निधी देताना चुकीचे निकष

By admin | Updated: October 4, 2015 00:01 IST

पालघर जिल्ह्यातील ९६६ गावांच्या बँक खात्यांमध्ये लवकरच पेसा योजनेंतर्गत ३६ कोटी ९९ लाख रुपये जमा करण्यात येणार आहेत. या निधीचे वाटप करताना चुकीचे

वसई : पालघर जिल्ह्यातील ९६६ गावांच्या बँक खात्यांमध्ये लवकरच पेसा योजनेंतर्गत ३६ कोटी ९९ लाख रुपये जमा करण्यात येणार आहेत. या निधीचे वाटप करताना चुकीचे निकष लावण्यात आल्याचे शासनाच्या निर्णयावरून स्पष्ट झाले आहे. एकूण ८ तालुक्यांपैकी ७ तालुके आदिवासी आहेत. या ७ तालुक्यांत वसई तालुका हा एकमेव तालुका बिगर आदिवासी आहे. या तालुक्यातील २७ गावांना १ कोटी २४ लाख ९७ हजार तर डहाणूसारख्या आदिवासीबहुल तालुक्यास १ कोटी २ लाख ९ हजार रुपये निधी मिळणार आहे. या तालुक्यात १७४ पेसा गावे आहेत.राज्यातील आदिवासी गावांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने ही योजना कार्यान्वित करण्यात आली. तालुक्यातील आदिवासी गावांची लोकसंख्या प्रमाण ठरवून या निधीचे वाटप करण्यात येते. परंतु, वसई व डहाणू तालुक्यांमध्ये चुकीचा निकष लावण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. (प्रतिनिधी)वसई तालुक्यात केवळ २७ गावे पेसा गावे असून त्यांना १ कोटी २४ लाख ९७ हजार तर डहाणूतील १७४ गावांना १ कोटी २ लाख ९ हजार रुपये निधी मंजूर झाला आहे. वसईत २७ गावांपैकी १५ गावे पूर्णत: आदिवासी आहेत, तर डहाणूची संख्या दुप्पट असताना आर्थिक निधी कमी का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. पालघर व वाडा तालुक्यांबाबतही चुकीचे निकष लावण्यात आल्याचे दिसून आले आहे. आदिवासी गावांचा विकास व्हावा, याकरिता शासनाने एक्स्टेन्शन टू शेड्युल्ड एरिया या योजनेंतर्गत आदिवासी उपयोजनेतून ५ टक्के निधी देण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. वर्ष २०१४ या योजनेस मंजुरी देण्यात आली.