शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

कृषी अर्थव्यवस्थेचा कणा मजबूत करणार?

By admin | Updated: May 18, 2017 03:49 IST

जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या खरीप हंगामासाठी कर्ज पुरवठा करणाऱ्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या रूपाने शेती अर्थव्यवस्थेचा कणा नोटबंदी पासून मोडला आहे

- हितेन नाईक । लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या खरीप हंगामासाठी कर्ज पुरवठा करणाऱ्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या रूपाने शेती अर्थव्यवस्थेचा कणा नोटबंदी पासून मोडला आहे. एकीकडे शेतकऱ्याला खरीप हंगामासाठीचे कर्ज मिळणे दुरापास्त झाले असतांना दुसरीकडे कर्जमाफी न देता सिंचनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा विकास करण्याची भाषा करणाऱ्या सरकारने जिल्ह्यातील सूर्या प्रकल्पाचे पाणी बिगर सिंचनासाठी वसई-विरारकडे वळविल्याने १९ हजार हेक्टराहून अधिक क्षेत्र सिंचनापासून वंचित राहणार आहे. त्यामुळे सरकारचे शेतकऱ्याबद्दलचे प्रेम हे बेगडी असल्याची भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत.जिल्ह्यातील बहुतांशी शेतकऱ्यांची बँक म्हणून ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची ओळख आहे. जिल्ह्यात ११८ शेतकी सहकारी संस्था असून त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जिल्हा बँकेतून कर्जाचे वाटप करण्यात येते. मात्र नोटा बंदीच्या काळापासून जिल्हा बँकेला लागलेली घरघर अजूनही थांबलेली नाही. ग्राहकांनी जुन्या नोटा बदलून देण्याच्या नावावर बँकेत जमा केलेल्या जुना नोटा नवीन नोटांमध्ये अजूनही परिवर्तित करुन मिळालेल्या नसल्याने शेतकऱ्यांना खरीपाचे कर्ज देणे बँकेला शक्य झालेले नाही. या उलट सरकारकडे शेतकऱ्यांना खरीपाची कर्जे देण्यासाठी शेतकी संस्था व जिल्हा बँक या खेरीज अन्य पर्याय उपलब्ध नाही. अशा स्थितीत जवळ येऊन ठेपलेल्या खरीप हंगामासाठी कर्ज न मिळाल्यास करायचे काय? असा प्रश्न जिल्ह्यातील शेतकरी खातेदारांना पडला आहे. मुख्यमंत्र्यांच्या उद्याच्या आढावा बैठकीत हा विषय अजेंड्यावर असून मुख्यमंत्री काय तोडगा काढणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहणार आहे.शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याऐवजी जलयुक्त शिवार व तत्सम मार्गाने शेती सिंचनाखाली आणून शेतकऱ्यांना सक्षम बनविण्याचे धोरण मुख्यमंत्र्यांनी आखले असताना दुसरीकडे केवळ सिंचनासाठी असलेल्या धरणातील बहुतांशी पाणी प्रकल्प क्षेत्राच्या बाहेर म्हणजेच वसई-विरार, मीरा-भार्इंदरला देऊन इथला शेतकरी उध्वस्त करण्याचे काम या सरकारने चालविले आहे. शेतीचे पाणी चक्क पळविले जात असतांना धरणावर व कालव्यावर केलेला कोट्यवधी रुपयांचा खर्चही वाया जात आहे.जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजना, कौशल्य विकास अंतर्गत रोजगार निर्मिती इ. विकासकामाने कुपोषण, स्थलांतर रोखण्याचा प्रयत्न शासन करीत असले तरी वाढवणं, जिंदाल बंदराच्या उभारणी मुळे इथला स्थानिक शेतकरी, मच्छिमार मात्र उध्वस्त होणार आहे. तारापूर एमआयडीसीतील कंपन्यामधून होणारे प्रदूषण मत्स्यसंपदा संपुष्टात आणत आहे, मच्छीमारांच्या घरांचे संरक्षण करण्यासाठी उभारण्यात येणारे धूप प्रतिबंधक बंधारे पर्यावरणाचा ऱ्हास होणार असल्याचे कारण देत सीआरझेड विभाग रद्द करीत असतांना हजारो तिवरे, जैव विविधता नष्ट करून उभारण्यात येणाऱ्या वाढवणं बंदराला सीआर झेड विभाग कशी परवानगी देते? कुपोषण, पोषण आहार, ढासळलेली वैद्यकीय सेवा (रुग्णांना उपचारासाठी गुजरात, सिल्वासाला जावे लागते), मासेमारी बंदी कालावधीतील अपेक्षित वाढ, अंडीधारक मासे आणि लहान पिल्लांची, मोठ्या प्रमाणात कत्तल होत असल्याने मासेमारी बंदीच्या कालावधीत वाढ करणे इ. महत्वपूर्ण ज्वलंत प्रश्नांबाबत मुख्यमंत्री काय निर्णय घेतात. याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे ह्यांनी वर्षभरा पूर्वी जव्हार-मोखाडयाला भेट देवून दिलेली आश्वासने हवेत विरली आहेत. राज्यपालांनी तिन्ही विभागांना एकत्रित करून कुपोषण निर्मूलनासाठी काम करण्याचा दिलेला सल्ला प्रत्यक्षात मात्र उतरला नाही. परिणामी ह्यावर्षीही बालमृत्यूच्या व कुपोषित बालकांच्या संख्येत घट झालेली नाही. या पाशर््वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी ही आढावा बैठक जव्हार, मोखड्यात घेणे गरजेचे होते.कुपोषण हा जिल्ह्याचा महत्वपूर्ण आणि गंभीर प्रश्न आहे. टास्क फोर्स निर्माण करून मुख्यमंत्र्यांनी या गंभीर प्रश्नात आपले लक्ष घातल्याचे दाखविले. परंतु महिला व बाल कल्याण विभाग अंतर्गत बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या जागा आजही रिक्त आहेत.