शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
4
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
5
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
6
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
7
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
8
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
9
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
10
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
11
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
13
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
14
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
15
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
16
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
17
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
18
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!
19
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
20
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य

बँकांच्या बाहेरील गर्दीचे करायचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 23:47 IST

वाढत्या रुग्णसंख्येची चिंता : मजूर, पेन्शनधारकच अधिक, सामाजिक अंतराचा फज्जा

हुसेन मेमनलोकमत न्यूज नेटवर्क 

जव्हार : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून ग्रामीण भागातही रुग्णसंख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. यासाठी सरकारने कडक संचारबंदी आणि लाॅकडाऊनसारखे पाऊल उचलले आहे. गर्दी नियंत्रणात आणून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र तरीही अर्थचक्र थांबू नये, यासाठी बँका सुरूच ठेवण्यात आल्या आहेत; परंतु ग्रामीण भागातही बँकांसमोर होणारी गर्दी चिंता निर्माण करीत असून या गर्दीचे करायचे काय, असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे. भल्या मोठ्या रांगाच्या रांगा आजही बँकेच्या बाहेर दिसत आहेत. सोशल डिस्टन्सचा पुरता फज्जा उडालेला असून खेडोपाड्यातील मजूर, पेन्शनधारक अशा विविध ग्राहकांची दररोज बँकेसमोर भली मोठी गर्दी बघावयास मिळत आहे.

जव्हार तालुक्यात दुसऱ्या लाटेतील कोरोनाचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात वाढला आहे. त्यामुळे खेडोपाड्यातील हजारो नागरिक बाधित झाले व कित्येक नागरिकांना कोरोनामुळे आपला जीवही गमवावा लागला आहे. मात्र हातावर पोट असलेल्या ग्रामीण भागातील मजुरांना व पेन्शनधारकांना कुटुंबांचे पालनपोषण करण्यासाठी दुसरे कुठलेच साधन नाही. त्यामुळे मजूरवर्ग आपला जीव धोक्यात टाकून दिवसभर उन्हात उभे राहून बँकेतून पैसे काढण्यासाठी ताटकळत आहेत.

प्रशासनाचे नियंत्रण नाही?जव्हारसारख्या भागांत बँकांबाहेर होत असलेली गर्दी लक्षात घेता बँक प्रशासनाचे या गर्दीवर नियंत्रण नसल्याचेच दिसून येत आहे. लोकांना त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी पैसे हवे असतात. त्यासाठी हे लोक बँकेत येत असतात; परंतु लोकांची होत असलेली गर्दी कोरोना प्रादुर्भावाला कारणीभूत ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दररोज ४००-५०० लोक तरी बँकेत येत असतात. काही लोकांच्या खात्यात पैसेही नसतात, तरीही ते रांगेत उभे राहतात. आम्ही त्यांचे पासबुक घेऊन त्यांच्या खात्यात पैसे जमा नसल्याचे सांगतो. त्यांच्या मजुरीचे पैसे पडलेले नसतात, मात्र लोकांच्या गरजा आहेत म्हणून ते येतात. मध्यंतरी आम्ही पोलिसांनाही कळवले होते.- अभिजीत कुलथे, महाराष्ट्र बँकेचे मॅनेजर, जव्हार

माझे वडील धनाजी टोकरे यांची पेन्शन काढण्यासाठी सकाळपासून बँकेच्या बाहेर उभा आहे. वडिलांचे वय झाल्यामुळे त्यांना जास्त वेळ उभे राहता येत नाही म्हणून मी रांगेत उभा राहून नंबर लावत आहे.- संतोष धनाजी टोकरे, ग्राहक, गरडवाडी

मजुरीसाठी दिवसभर बँकेच्या बाहेर उन्हात आम्ही उभे राहतो, मात्र पहिल्या दिवशी नंबर लागला नाही तर पुन्हा दुसऱ्या दिवशी उन्हात उभे राहावे लागत आहे. बँकेने टोकन पद्धत सुरू केल्यास ग्राहकांचा वेळ वाचेल आणि गर्दीही होणार नाही.- पांडुरंग कृष्णा पागी, ग्राहक, जांभूळविहीर, जव्हार

आम्ही बँकेला काही दिवस बंद ठेवण्यासाठी सांगितले होते. मात्र बँका परत उघडल्यावर जास्त गर्दी होईल, त्यामुळे पर्यायी म्हणून बँकेच्या जागा क्षमतेनुसार दिवसाला ५० ते १०० ग्राहकांना टोकन वाटप करून तितकेच ग्राहक बँकेने करावे आशा सूचना दिल्या आहेत.- संतोष शिंदे, तहसीलदार, जव्हार

 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारcorona virusकोरोना वायरस बातम्या