शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

लाटा धोक्याच्या ठरणार

By admin | Updated: May 19, 2014 05:43 IST

मुंबई शहर आणि उपनगरांतील नाल्यांची साफसफाई ६० टक्के झाल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला असला तरी छोटे नाले अजूनही तुंबलेले आहेत.

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांतील नाल्यांची साफसफाई ६० टक्के झाल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला असला तरी छोटे नाले अजूनही तुंबलेले आहेत. त्यामुळे जून आणि जुलै महिन्यात समुद्रकिनारी उठणार्‍या मोठ्या लाटा मुंबईकरांसाठी धोक्याच्या ठरणार आहेत. मुंबई शहर आणि उपनगरांत ऐन पावसाळ्यात पाणी साचून मुंबई तुंबण्याच्या घटना काही नव्या नाहीत. रस्त्यासह सखल भागात पाणी साचत असल्याने ही समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे. सखोल भागात साचलेल्या पाण्याचा निचरा व्हावा; म्हणून महापालिका प्रशासन पम्पिंग स्टेशनसह विविध उपाययोजना राबविण्याच्या तयारीत आहे. मात्र ऐनवेळी मुसळधार पाऊस आणि भरतीच्या वेळा एकत्र आल्यास समस्यांत आणखी भर पडते आणि मुंबापुरी जाम होते. या वेळच्या पावसाळ्यादरम्यान जुन आणि जुलै महिन्यांत साडेचार मीटर उंचीहून अधिक लाटा समुद्रकिनारी उठणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे मुंबई दीड-दोन तास पाऊस पडला तरी मुंबई तुंबणे काही नवे नाही. शिवाय पाण्याचा निचरा होत नसल्याने ऐन भरतीवेळी पाणी समुद्रात वाहत नाही़ परिणामी मुंबईकरांना समस्यांना सामोरे जावे लागते. दरम्यान, यावर्षीही नाले साफ झाल्याचा दावा पालिकेने केला असला तरी ऐन मोठ्या पावसात उठणार्‍या उंच लाटांनी मुंबईत पाणी साचून राहण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)