शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

दाभोण सागदेवपाड्यात पाणीबाणी

By admin | Updated: March 21, 2017 01:38 IST

डहाणू तालुक्यातील दाभोण सागदेवपाड्यात तीव्र बाणीबाणी निर्माण झाली असून हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे.

अनिरुध्द पाटील / बोर्डीडहाणू तालुक्यातील दाभोण सागदेवपाड्यात तीव्र बाणीबाणी निर्माण झाली असून हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे. येथील दाभोण, रणकोळ, ऐना,साये ,निकणे या गावचे ग्रामस्थ डोंगरदऱ्यांमध्ये पाण्याचा शोध घेत फिरत असल्याचे विदारक चित्र आहे. मात्र स्थानिक प्रशासन या जीवघेण्या समस्येबाबत अनिभज्ञ असल्याचे दिसते.तालुक्यातील या भागातील नद्या पावसाळ्यात दुथडी भरुन वाहतात मात्र उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. तालुक्यातील अनेक गावे आणि वाड्यांचे विदारक चित्र दाखवणारे दाभोणचा सागदेवपाडा हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. या पाड्याकरिता बांधण्यात आलेल्या विहिरिचे पाणी दूषित झाल्याने डबक्यातून पाणी भरण्याची वेळ नागरिकांवर ओढवली आहे. येथे शासनाने पाणीपुरवठयाची नळपाणी योजनाच राबावलेली नसल्याने नळाचे पाणी म्हणजे काय? ते कसे व कोठून येते हे गावकऱ्यांना ठाऊक नाही. त्यामुळे डोंगरकपारितील अवघड पाऊल वाटेवरून थेंब थेंब पाण्यासाठी त्यांचा संघर्ष सुरु झाला आहे. याची जाणीव स्थानिक लोकप्रतिनिधी वा अधिकाऱ्यांना नाही. टंचाई निवारणासाठी शासन दरवर्षी करोडो रूपयांचा निधी खर्च करीत असली तरी नियोजना अभावी गरज असलेली गावं लाभापासून वंचित राहतात. त्यामुळे मानवाधिकारी संस्था तसेच सोशल ग्रुपच्या माध्यमातून सर्वेक्षण करून जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेऊन योजना कार्यान्वित करण्याची मागणी केली जात आहे.