शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पाझर तलावातून टँकरने पाणी चोरी

By admin | Updated: March 30, 2016 01:17 IST

मार्च महिन्यात अखेरीस वसई विरार शहराला पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्या असतांनाच सुगीचे दिवस आलेल्या टँकर लॉबीने तहसिलदारांचे आदेश धाब्यावर बसवून विरार जवळील

- शशी करपे,  वसई मार्च महिन्यात अखेरीस वसई विरार शहराला पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्या असतांनाच सुगीचे दिवस आलेल्या टँकर लॉबीने तहसिलदारांचे आदेश धाब्यावर बसवून विरार जवळील एका पाझर तलावामध्ये पाणी चोरायला सुरुवात केली आहे उसगाव नदीतून पाणी उचलण्याचे आदेश तहसिलदारांनी दिले असताना टँकर लॉबीने जवळच असलेल्या विहीरी आणि बोअरवेलमधून बेकायदा पाणी उपसा सुरु केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे बांधकामांनाही आता टँकरने पाणी पुरवले जाऊ लागले आहे. वसई विरार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पेल्हार आणि उसगाव धरणातील पाणी साठा कमी होऊ लागला आहे. सूर्या धरणातून दररोज होणाऱ्या शंभर एमएलडी पाण्यावर शहराची मदार आहे. एकीकडे, इतर धरणातील पाणी साठा कमी होत चालला असताना सूर्या धरणातून पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमध्येही अधूनमधून बिघाड होत असल्याने शहरात कमी दाबाने आणि अनियमित पाणी पुरवठा करावा लागत आहे. त्यामुळे शहरातील अनेक भागांमध्ये पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. पाणी टंचाईचा फायदा टँकर लॉबीला होऊ लागला आहे. वसई तालुक्यात सध्या साडेसहाशेहून अधिक टँकर धावतात. प्रत्येक टँकर दिवसाला चार फेऱ्या मारतो. यावरून महापालिका पाणी पुरवण्यास अपयशी ठरत असल्याचे दिसून येते. टँकर चालक वसईच्या पूर्वेकडील गावांमधील विहीरी आणि बोअरवेलमधून पाणी उपसा करून पुरवठा करीत आहेत. त्याठिकाणच्या लोकांच्या तक्रारी आल्यानंतर वसईचे तहसिलदार गजेंद्र पाटोळे यांनी टँकर बंदी घातली होती. त्यामुळे वसईतील टँकर तीन दिवस बंद होते. पण, पाणी टंचाई लक्षात आल्यानंतर प्रांताधिकारी आणि तहसिलदारांनी टँकर चालकांना उसगाव नदीतून पंधरा दिवस पाणी उचलण्यास परवानगी दिली होती. तसेच गावातील विहीरी आणि बोअरवेलमधून पाणी उपसा करण्यास बंदी घातली होती. त्याचबरोबर तलाठ्यांमार्फत स्थानिक विहीर आणि बोअरवेल मालकांना टँकरना पाणी विकण्यास मनाई केली होती. खुलेआम विहिर, बोअरवेलमधून पंपाने उपसा- टँकरचालक आणि विहीर व बोअरवेल मालकांनी तहसिलदारांचा आदेश धुडकावून पाणी विकण्याचा धंदा खुलेआम सुरु ठेवला आहे. - उसगाव नदी तीस ते चाळीस किलोमीटर दूर असल्याने वेळ आणि इंधन वाया जाऊन आर्थिक नुकसान होत असल्याने टँकर चालकांनी विरार, नालासोपारा आणि वसई पूर्वेकडील गावांमधील विहीरी आणि बोअरवेलमधून पाणी उपसा सुरु ठेवला आहे. धक्कादायक बाब म्हणजे अनेक ठिकाणी महावितरणच्या खांबांवरून चोरीचे वीज कनेक्शन घेतले गेल्याचे दिसून येते.पाझर तलावावर ‘दरोडा’पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन टँकर लॉबीने जवळच्या ठिकाणाहून जिथून मिळेल तिथून पाणी चोरायला सुरुवात केली आहे. विरारपासून सात किलोमीटर अंतरावर गासपाडा गावच्या हद्दीत असलेल्या एका पाझर तलावातून पंप लावून टँकरमध्ये पाणी भरले जाते. गावातील एक माणूस सरकारी तलावातील पाणी विकण्याचा धंदा करीत आहे. या परिसरात काही जणांनी बोअरवेल मारल्या असून त्यातूनही पाणी विक्री केली जात आहे. नालासोपाऱ्यातहिरवळीवर पाणी नालासोपारा शहरात सध्या प्रचंड पाणी टंचाई भेडसावत आहे. मात्र, शहरातील पोलीस स्टेशनच्या बाजूला असलेल्या शुर्पारक मैदानातील हिरवळीवर दिवसातून दोन वेळा चक्क दीड दीड तास पाणी मारले जात आहे. इथून जवळच पालिकेचा १० लाख लिटर क्षमतेचा जलकुंभ आहे. त्यामधून मैदानातील हिरवळीसाठी पाणी वापरले जात आहे.