शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
3
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
4
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
5
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
6
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
7
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
8
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
9
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
10
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
11
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
12
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
13
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
14
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
15
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
16
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
17
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
18
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
19
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
20
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

१३ कोटी खर्चूनही वसईत दूषित पाणी

By admin | Updated: April 15, 2017 03:09 IST

पाणी पुरवठा व्यवस्थेवर दरवर्षी तब्बल तेरी कोटीहून अधिक रुपये खर्च केले जातात. तरीही वसईकरांना एक दिवस आड अपुरे आणि अनियमित पाणी मिळते. त्याचबरोबर दुषित

वसई : पाणी पुरवठा व्यवस्थेवर दरवर्षी तब्बल तेरी कोटीहून अधिक रुपये खर्च केले जातात. तरीही वसईकरांना एक दिवस आड अपुरे आणि अनियमित पाणी मिळते. त्याचबरोबर दुषित पाणीही पुरवले जाते. त्यामुळे ठेकेदारांना काळ््या यादीत टाकून महापालिकेची लूट थांबवावी अशी मागणी शिवसेनेच्या गटनेत्या किरण चेंदवणकर यांनी आयुक्तांकडे केली आहे. वसई विरार शहराला सूर्या योजनेतून १०० एमएलडी, उसगाव योजनेतून २० एमएलडी, पेल्हार धरणातून १० एमएलडी आणि पापडखिंड धरणातून एक एमएलडी पाणी मिळून दररोज १३१ एमएलडी पाणी पुरवठा केला जातो. पाणी पुरवठा वितरण, देखभाल, दुरुस्ती आणि व्यवस्थापनाकरता दरसाल ६ कोटी ७८ लाख ४० हजार ४०० रुपये खर्च केला जातो. त्याचबरोबर पाणी पुरवठा योजनांच्या जलशुद्धीकरण प्रकल्पांच्या देखभाल दुरुस्तीसाठी ५ कोटी रुपये, जलशुद्धीकरणासाठी वापरण्यात येणारी रसायने यासाठी १ कोटी २२ लाक ८० हजार ८०० रुपये, क्लोरीन, गॅस टनर आणि अ‍ॅलम पुरवठा कामी ५५ लाख ५९ हजार ६०० रुपये खर्च केला जातो. त्याचबरोबर विभागीय पाणी पुरवठा व्यवस्थापनेवरही लाखो रुपये खर्च केले जातात. हा सर्व खर्च दरवर्षी १३ कोटीहून अधिक होतो. असे असतानाही महापालिकेकडून रहिवाशांना एक दिव आड तोही अपुरा आणि अनियमित पाणी पुरवठा होत असतो. इतकेच नाही तर अनेक भागात दुषित पाणी पुरवठा होतो, असा चेंदवणकर यांनी आरोप केला आहे. याशिवाय दरमहा जलवाह्न्यिा फुटत आहेत. वीज पुरवठा खंडीत होत असल्याने पाणी पुरवठा विस्कळीत होत असतो. त्यामुळे वर्षाला किमान वीस ते तीस दिवस पाणी पुरवठा खंडीत होत असतो. पण, दुरुस्तीच्या नावाखाली जनतेचे करापोटी जमा झालेले कोट्यवधी रुपये ठेकेदारांना दिले जात आहेत. (प्रतिनिधी)