शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

अंधांना किल्ल्यांचे दर्शन घडवणारी वैशाली देसाई

By admin | Updated: April 14, 2017 03:01 IST

नालासोपाऱ्यातील वैशाली देसाई -मोघे यांनी अंधांना थेट ऐतिहासिक गड-किल्ल्यांची सफर घडवण्याचा वसा हाती घेतला असून आतापर्यंत त्यांनी अंधांना घेऊन तेरा ठिकाणची सफर तीही स्वखर्चाने घडवली आहे.

वसई : नालासोपाऱ्यातील वैशाली देसाई -मोघे यांनी अंधांना थेट ऐतिहासिक गड-किल्ल्यांची सफर घडवण्याचा वसा हाती घेतला असून आतापर्यंत त्यांनी अंधांना घेऊन तेरा ठिकाणची सफर तीही स्वखर्चाने घडवली आहे.वैशाली यांना पहिल्यापासूनच ट्रेकिंगची आवड. त्यांनी आतापर्यंत देशभरातील अनेक गड किल्ले, पर्वतांवर ट्रेकिंग केली आहे. स्वत:ची नोकरी-व्यवसाय सांभाळून ट्रेकिंगची आवड जोपासणाऱ्या वैशाली यांनी अंधांना ट्रेकिंगच्या माध्यमातून आनंद, अनुभव देण्याचे काम हाती घेतले आहे. ट्रेकिंगचा इतरांंनाही आनंद, अनुभव द्यावा म्हणून ना नफा ना तोटा तत्वावर त्यांनी कल्पविहार अ‍ॅव्हेंचर ही संस्था स्थापन केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत विशेषत: महिलांसाठी पैसा उभा करण्याकरता नोकरी-व्यवसाय सुरु ठेवला आहे. अंध मुलांचे रायटर म्हणून काम करताना वैशालींना या मुला-मुलींना निसर्गाच्या सान्निध्यात जावेसे वाटते, ट्रेकिंग करावेसे वाटते, छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचे दर्शन घ्यावे, सफर करावे असे वाटत असल्याचे प्रकर्षाने जाणवले. पण, ही इच्छा कोण पुर्ण करणाऱ या विचाराने अंधांची इच्छा मनातच दडपून जात असल्याचेही त्यांना जाणवले. ही बाब वैशालींच्या लक्षात येताच त्यांनी या मुलांना स्वखर्चाने ट्रेकवर नेण्याचा निश्चय केला. २००५ साली त्यांनी २० अंध मुला-मुलींना सोबत घेऊन पेठचा पहिला ट्रेक यशस्वी केला. यावेळी सहभागी झालेल्या मुला-मुलींचा उत्साह, आनंद, समाधान पाहून आज खऱ्या अर्थाने ट्रेकींगचा अनुभव घेतल्याचे वैशाली यांनाही जाणवले. त्यानंतर त्यांनी दरवर्षी ट्रेकींगवर जाण्याचा निर्धार करीत सुुरु ठेवला. यंदाचा तेरावा ट्रेक महाबळेश्वर येथील तापेले येथे पूर्ण केला. स्वत:च्या नोकरी व्यवसायातून ट्रेकींगचा खर्च भागवणे अशक्य असल्याचे वैशाली यांच्या लक्षात आले. पण, त्यावेळी मदतीचे अनेक हातही पुढे आले. त्याचबरोबर अनेक जण कशाला या भानगडीत पडतेस, उद्या काही झाले तर कोण जबाबदार असा सल्ला देत असतात. तर स्वयंसेवकही अंध ट्रेकरसोबत येण्यास फारसे उत्सुक नसल्याचा अनुभवही त्यांना येत आहे. तरी, वैशाली देसाई यांनी अंध मुला-मुलींसाठी ट्रेकिंगच्या माध्यमातून आनंद आणि जीवनाचा अनुभव देत आहेत. (प्रतिनिधी)